दोहा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर कतारने सद्भावनेचे पाऊल उचलत मंगळवारी २३ भारतीय कैद्यांची सुटका केली. मोदींनी कतारच्या नेतृत्वासमोर भारतीयांच्या कल्याणाचा मुद्दा उपस्थित केला होता. रमजानच्या पवित्र महिन्याच्या प्रारंभी सद्भावनेचे पाऊल उचलत भारतीय कैद्यांची सुटका केल्याबद्दल मोदींनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांचे आभार मानले. पंतप्रधानांनी टिष्ट्वट केले की, ‘विशेष महिन्याच्या प्रारंभी सद्भावनेच्या भूमिकेतून विशेष पाऊल उचलण्यात आले. कतार सरकारने २३ भारतीय कैद्यांची सुटका केली. हे कैदी मायदेशी परतणार आहेत.’
कतारकडून २३ भारतीयांची सुटका
By admin | Published: June 08, 2016 3:15 AM