ब्रिटनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन वर्षांच्या सावत्र मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जमिनीवर तडफडत होता, परंतु रुग्णवाहिका बोलवण्याऐवजी महिलेने त्याचा व्हिडीओ काढला. मुलाचा दोन दिवसांनी रुग्णालयात मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. मात्र याप्रकरणी आता महिलेला दोषी ठरवत न्यायालयाने तिला 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, 7 ऑगस्ट 2021 रोजी मॅन्सफिल्डजवळील जॅक्सडेलमध्ये हार्वे बोरिंगटन पॅरामेडिक्स बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याची 23 वर्षीय सावत्र आई लीला बोरिंगटन त्यावेळी हार्वेसोबत घरी उपस्थित होती. मुलगा खुर्चीवरून खाली पडल्याचं लीलाने सांगितले. तो बोलू शकत नसल्यामुळे, तिने इमर्जन्सी कॉल करण्यापूर्वी पॅरामेडिक्सला त्याची स्थिती दाखवण्यासाठी एक व्हिडीओ बनवला.
वैद्यकीय तज्ज्ञांनी लीला यांच्या वाईट कृत्यांचा पर्दाफाश केला. हार्वेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या मेंदूत खूप रक्तस्त्राव झाला होता. मुलाच्या कवटीला आणि हातालाही फ्रॅक्चर झाल्याचे तपासात समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते खुर्चीवरून पडल्यामुळे अशा जखमा होत नाहीत. मुलाच्या डोक्यात वारंवार वार करण्यात आले असावेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
दोन दिवसांनंतर 9 ऑगस्ट रोजी हार्वेचा रुग्णालयात मृत्यू झाला. हॉलरॉयड कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान खरी आई कॅटी रडू लागली. लिलाने आपल्या मुलाची निर्घृण हत्या केली असल्याचं म्हटलं आहे. इमर्जन्सी नंबरवर कॉल करण्याऐवजी लीलाने हार्वेच्या वडिलांना "हे फक्त माझ्यासोबतच का होते?" असा मेसेज पाठवला होता. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने लीलाला दोषी ठरवत 15 वर्षांची शिक्षा सुनावली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"