वॉशिंग्टन : मुंबई हल्ल्याच्या (२६/११) गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी अमेरिका भारताला शक्य ती सर्व मदत करील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटले. मुंबईवर प्रत्यक्ष झालेल्या हल्ल्याच्या आधीचे दोन प्रयत्न फसले होते आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्या दोन फसलेल्या प्रयत्नांनंतर तिसरा हल्ला घडविला अशी कबुली लष्कर ए तयब्बाचा अतिरेकी डेव्हिड हेडली याने मुंबईतील न्यायालयाकडे सोमवारी दिल्यानंतर अमेरिकेने ही भूमिका घेतली आहे. २६/११ च्या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना न्यायालयात आणण्यासाठी अमेरिकेच्या कायद्यानुसार जी मदत व साह्य करणे शक्य आहे ते सगळे आम्ही भारत सरकारला देण्यास बांधील आहोत, असे किर्बी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.
२६/११ हल्ला : गुन्हेगारांना शिक्षेसाठी भारताला मदत
By admin | Published: February 10, 2016 2:19 AM