इस्लामाबाद : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेला झकिउर रहमान लख्वी याला आवश्यक खर्चासाठी दर महिन्याला दीड लाख पाकिस्तानी रुपये देण्यास संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने मान्यता दिली आहे. ही भारतासाठी चिंताजनक बाब आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने केलेल्या विनंतीनुसार संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. लख्वी याला दहशतवादी घोषित केल्यानंतर त्याची मालमत्ता जप्त झाली व बँक खाती गोठविण्यात आली आहेत. झकिउर रहमान लख्वी याला दर महिन्याला देण्यात येणाऱ्या दीड लाख पाकिस्तानी रुपयांतून जेवणासाठी पन्नास हजार रुपये, औषधांसाठी पंचेचाळीस हजार रुपये, तत्कालिक खर्चासाठी वीस हजार रुपये, वकिलाच्या फीकरिता वीस हजार रुपये व प्रवासासाठी पंधरा हजार रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही रक्कम लख्वीच्या बँक खात्यातून त्याला दर महिन्याला वळती करण्यात येईल. लख्वी याची जामिनावर मुक्तता झाली आहे.
२६/११ : सूत्रधार लख्वीला खर्चासाठी पाक देणार पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 7:12 AM