लोकमत न्यूज नेटवर्ककोविड-19! चीनमध्ये पहिल्यांदा या साथीच्या आजाराचा उगम झाल्यानंतर इतक्या झपाट्यानं संपूर्ण जगात त्याचा प्रसार हाईल आणि अख्खं जग त्याच्या कचाट्यात सापडेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. अमेरिकेसह बहुसंख्य देशांना वाटलं होतं, चीनमध्ये उगम झालेल्या या रोगाचा फटका केवळ चीनलाच बसेल, आपल्यापर्यंत तो येणार नाही. पण तसं झालं नाही. जगातल्या जवळपास प्रत्येक देशाला कोरोनाचा फटका बसला आहे. अनेक पातळ्यांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे, पण सर्वात मोठा परिणाम झाला आहे, तो लोकांच्या भुकेवर आणि अर्थातच त्यांच्या जगण्या-मरण्यावर!संयुक्त राष्ट्रसंघानंही त्याबाबत चिंता व्यक्त करताना जगाचं काय होईल याबाबत प्रo्नचिन्ह उभं केलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचं म्हणणं आहे. कोरोनाचा प्रभाव इतका प्रचंड असेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. कोरोनामुळे अख्ख्या जगालाच व्यापक दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जगातल्या कोट्यवधी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न मदत संस्थेचे प्रमुख व वर्ल्ड फूड प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डेव्हीड बिसले यांनी तर जगाला इशारा देताना म्हटलं आहे, ‘विकसनशील जगातील तीसपेक्षा अधिक देशांत अन्नधान्याचा तीव्र दुष्काळ यामुळे पडण्याची शक्यता आहे. त्यातल्या दहा देशांत आधीच एक कोटीहून अधिक लोक उपाशी आहेत. ज्या लोकांना उपाशीपोटी झोपावं लागतंय त्यांच्याविषयी आम्ही बोलत नाही आहोत. आम्ही आत्ताच्या आपत्कालिन परिस्थितीविषयी बोलतो आहोत. लोकं अक्षरश: उपासमारीच्या दिशेनं निघाले आहेत आणि दर दिवसागणिक मृत्यूच्या दाढेत ते ढकलले जात आहेत. या लोकांना जर आपण वेळेत अन्नधान्याचा पुरवठा करू शकलो, नाही, त्यांना खायला मिळालं नाही, तर त्यांचं मरण अटळ आहे!’या तीस देशांतील जवळपास 27 कोटी लोक आजच मरणाच्या दारात उभे आहेत, असंही संयुक्त राष्ट्रसंघाचं निरीक्षण आहे. डेव्हीड बिसले यांचं म्हणणं आहे की, कोरोना अजूनही आपले हातपाय पसरतोच आहे. कृती करायला आपल्याला फार थोडा वेळ आहे. आपण जर याबाबत फक्त विचारच करत राहिलो आणि प्रत्यक्ष कृतीला थोडाही उशीर केला, तर या गरीब, भुकेकंगाल लोकांची कलेवरं पाहण्याशिवाय आपल्या हातात काहीच राहणार नाही. या अत्यंत बिकट अशा परिस्थितीत या विकसनशील देशांपुढील आव्हान अतिशय बिकट आहे. त्यांना स्वत:ला तर यावरचा पर्याय शोधून काढावाच लागेल, युद्धपातळीवर त्यासाठी प्रय} करावेच लागतील, पण जगातल्या इतर देशांनीही या लोकांना मदत केली पाहिजे. या काळात कुठलाही भेदभाव, अपपरभाव प्रत्येकाच्याच विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. कोरोनाचा मुकाबल आणि त्याविरुद्धचा आमचा बचाव आम्ही स्वत:, एकट्यानंच करू शकतो, असा कुठल्याही देशाचा समज असेल, तर तो चुकीचा आहे, असंही संयुक्त राष्ट्रसंघानं स्पष्ट केलं आहे. आज सुरुवातीला हे तीस देश सुपात आहेत, पण कालांतरानं इतर देशही त्याच वाटेवर येऊ शकतात, त्यामुळे एक व्हा, एकत्र या, एकमेकांना मदत करा, भुकेल्यांच्या पोटात किमान दोन घास जाऊ द्या. हीच आजची तातडीची गरज आहे.
जगातील 27 कोटी लोक भूकबळीच्या वाटेवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 1:23 PM
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न मदत संस्थेचे प्रमुख व वर्ल्ड फूड प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डेव्हीड बिसले यांनी जगाला इशारा देताना म्हटलं आहे, ‘विकसनशील जगातील तीसपेक्षा अधिक देशांत अन्नधान्याचा तीव्र दुष्काळ यामुळे पडण्याची शक्यता आहे. त्यातल्या दहा देशांत आधीच एक कोटीहून अधिक लोक उपाशी आहेत. या तीस देशांतील जवळपास 27 कोटी लोक आजच मरणाच्या दारात उभे आहेत.
ठळक मुद्देतीस विकसनशील देशांना संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा!