बीजिंग : चीनच्या हुबेई प्रांतात कोरोना व्हायरसने आणखी ५२ जणांचा बळी घेतल्यामुळे देशात या विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या बुधवारी २,७१५ वर गेली व बाधा झालेल्यांची संख्या ७८,०६४ झाली.हुबेई प्रांत या विषाणूचे केंद्र असून, तेथे कोरोना व्हायरस पसरण्याची गती कमी झाल्याची चिन्हे आहेत तरी तेथेच ४०६ जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले. गंभीर रुग्णांची संख्या ३७४ ने घटून ८ हजार ७५२ झाली आहे.अनावश्यक प्रवास टाळानवी दिल्ली : रिपब्लिक आॅफ कोरिया, इराण आणि इटलीचा प्रवास अगदीच गरज नसेल, तर टाळावा, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना दिला आहे. कारण या तिन्ही देशांत कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. रिपब्लिक आॅफ कोरिया, इराण आणि इटलीतून येणारे लोक किंवा १० फेब्रुवारी, २०२० पासून या देशांतून प्रवास केलेल्यांना ते भारतात येताच १४ दिवस वेगळे ठेवले जाते, असे मंत्रालयाने सांगितले. यापूर्वी सिंगापूरलादेखील अनावश्यक प्रवास टाळावा, असा सल्ला २० फेब्रुवारी रोजी मंत्रालयाने नागरिकांना दिला होता.अमेरिकन सैनिकाला बाधासोल : दक्षिण कोरियात असलेल्या अमेरिकेच्या सैनिकांपैकी एकाला कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. देशात या विषाणूची बाधा झालेले नवे २८४ रुग्ण समोर आले असून, त्यातील २१६ दाएगू भागातील आहेत, असे देशाच्या आजार नियंत्रण केंद्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)डायमंड प्रिन्सेसवरील काही प्रवाशांना तापटोकियो : कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या जपानच्या डायमंड प्रिन्सेस या जहाजावरून जाण्याची परवानगी दिलेल्या काही डझन प्रवाशांमध्ये तापाची लक्षणे आढळली असून, त्यांनी कोरोना व्हायरस नाही, याच्या चाचण्या करून घ्यावात, असे सांगितले जाईल, असे जपानच्या आरोग्यमंत्र्यांनी बुधवारी सांगितले.जपानमध्ये कोरोना व्हायरसची बाधा होऊन एकाचा मृत्यू झाल्याची बातमी आल्यानंतर सरकारने मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून येत्या १५ दिवसांत एक तर ते रद्द करावेत किंवा त्यांची संख्या घटवावी, असे आवाहन केले.या जहाजावरील ८१३ माजी प्रवाशांशी आम्ही संपर्क साधला त्यापैकी ४५ जणांमध्ये काही लक्षणे आढळली, असे आरोग्यमंत्री काटसुनोबू काटो यांनी संसदेत सांगितले.
चीन : कोरोना व्हायरसने घेतले २,७१५ बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 2:52 AM