शहरं
Join us  
Trending Stories
1
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
2
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
4
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
5
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
6
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
7
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
8
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
9
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
10
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
11
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
12
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
13
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?
14
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
15
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
16
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
17
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
18
Suzlon Energy बाबत मोठी अपडेट, एक वृत्त आणि शेअरनं पकडला रॉकेट स्पीड
19
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
20
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार

Pakistan: पाकिस्तानात पावसामुळे २८२ जणांचा मृत्यू; २० वर्षांचा रेकॉर्ड तुटला, अनेक भागात बत्ती गुल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 6:53 PM

पाकिस्तानात पावसाचे तांडव सुरूच असून पावसाने मागील २० वर्षांचा विक्रम मोडला आहे.

इस्लामाबाद ।  

पाकिस्तानात पावसाचे तांडव सुरूच असून पावसाने मागील २० वर्षांचा विक्रम मोडला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत २८२ पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अलीकडेच पाकिस्तानमधील प्रमुख शहर लाहोरमध्ये सलग सात तास पाऊस पडत होता. सततच्या पावसामुळे पाकिस्तानातील नागरी सेवा विस्कळीत झाल्या असून मोठी जिवीतहानी होत आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार, पावसाने मागील २० वर्षांचा विक्रम मोडला आहे, ज्यामध्ये जवळपास २३८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

वृत्तवाहिनी एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, लाहोरमध्ये गुरूवारी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. अनेक भागातील वीजसेवा खंडित करण्यात आली तर शहरातील काही भागांतील घरांमध्ये पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे रस्ते नदीमय झाले असून वादळी वाऱ्यामुळे शहरातील अर्धा भाग वीजेअभावी अंधारात गेला आहे. 

मागील ४ आठवड्यात २८२ लोकांचा मृत्यू देशाचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मागील चार आठवड्यात पावसामुळे पाकिस्तानातील विविध भागातील तब्बल २८२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय अन्य २११ लोकांचा जखमींमध्ये समावेश आहे. 

पावसामुळे शहरांना आले नदीचे रुप  मुसळधार पावसामुळे पाकिस्तानातील अनेक घरं  आणि गावं नदीमय झाले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून उभी पिकं आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. तसेच खराब झालेल्या रस्त्यांमुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. अशी माहिती पाकिस्तानातील न्यूज एजेंसी सिन्हुआने दिली. याआधी पाकिस्तानमधील हवामान विभागाने शुक्रवार ते मंगळवार या कालावधीत प्रांतातील विविध जिल्ह्यांमध्ये अधिक मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयPakistanपाकिस्तानRainपाऊसDeathमृत्यू