शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

बाबो! ८ मुलांची आई नवव्यांदा गर्भवती, लोक म्हणाले फुटबॉल टीम बनवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 6:36 PM

मुल वाढताना पाहणं, हे आपलंच बालपण दुसऱ्यांदा अनुभवण्यासारखं असतं, असंही अनेकांना वाटतं. पण या हौसेपायी किती मुलं असावीत, हा प्रत्येकाला प्रश्न असतो. अमेरिकेतील एका जोडप्याला आतापर्यंत 8 मुलं झाली, तरी त्यांची हौस काही फिटत नसल्याचं चित्र आहे.

आतापर्यंत आठ मुलांची आई (Mother of 8 kids) झालेल्या एका तरुणीनं आता नवव्या मुलाच्या जन्माची (Pregnant for ninth time) तयारी सुरू केली आहे. मुलं हा (Babies) अनेकांच्या आवडीचा विषय असतो. आपल्या संसारात लहान मुल असावं आणि त्याला वाढवत वाढवत आयुष्य सुखानं संपावं, असं अनेकांना वाटत असतं. मुलं घरात असतील, तर घरातील वातावरण खेळकर राहतं आणि घरात सतत आनंदाचे अनुभव येत राहतात. मुल वाढताना पाहणं, हे आपलंच बालपण दुसऱ्यांदा अनुभवण्यासारखं असतं, असंही अनेकांना वाटतं. पण या हौसेपायी किती मुलं असावीत, हा प्रत्येकाला प्रश्न असतो. अमेरिकेतील एका जोडप्याला आतापर्यंत 8 मुलं झाली, तरी त्यांची हौस काही फिटत नसल्याचं चित्र आहे.

अमेरिकेतील डलास भागात राहणाऱ्या २९ वर्षांच्या यालेंसिया रोसारियोला आठ मुलं आहेत. तिचा ३६ वर्षांचा पती मायकलला आपल्याला १० ते १२ मुलं असावीत, अशी इच्छा आहे. त्याची इच्छा आपल्याला आवडली असल्याचा यालेंसिया सांगते. आपली जरी एवढं मुलं व्हावीत, अशी इच्छा नसली, तरी आपली त्याला काही हरकत नसल्याचं तिचं म्हणणं आहे. आतापर्यंत या कुटुंबाला 8 मुलं आहेत आणि आश्चर्य म्हणजे यात एकही मुलगी नाही. सगळेच्या सगळे मुलगे आहेत. आता यालेंसिया आणखी एका बाळाला जन्म देणार असून नुकतीच त्यांनी गर्भजल परिक्षण केलं. अमेरिकेत गर्भजल परिक्षण कायदेशीर असून तो गुन्हा मानला जात नाही. या परिक्षणात नववं अपत्यदेखील मुलगाच असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या कुटुंबात आनंदाचं वातावरण असून सर्वांनी नव्या बाळाच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे.

वास्तविक, आपल्या चौथ्या बाळाचा काही दुर्दैवी कारणांनी मृत्यू झाला होता, असं यालेंसिया सांगते. मात्र आजही तो आमच्यातच राहत असल्याचं आम्ही मानतो. त्यामुळे त्याच्यासह आम्ही मुलांची संख्या मोजतो, असं ती सांगते.

लोकांनी या बाबीवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्ही एक फुटबॉल टीम तयार करायला हरकत नाही, असा मजेशीर सल्ला एकाने दिला आहे. तर आता मुलगी होईपर्यंत थांबू नका, असंही एकानं सुचवलं आहे. यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर हे कुटूंब सध्या चांगलंच प्रसिद्ध झालं आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके