काबूल : अफगाणिस्तानमध्ये शनिवारी अवघ्या अर्ध्या तासामध्ये भूकंपाचे तीन धक्के बसले. त्यापैकी सर्वांत मोठा धक्का ६.३ रिश्टर स्केलचा होता. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हेरात शहरापासून ४० किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
भूकंपाचा सर्वाधिक फटका हेरात प्रांतातील झेंडा जन जिल्ह्याला बसला. सकाळी ११ वाजेच्या सुमारास भूकंपाचे तीन धक्के जाणवले. त्याची तीव्रता ५.५, ६.३ आणि ५.९ रिक्टर स्केल इतकी होती. भूकंपात अनेक घरांची पडझड झाली. आतापर्यंत १५ लोकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण किरकोळ जखमी झाले आहेत. इमारतींच्या मलब्याखाली अनेकजण अडकल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.