अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. फॉक्स न्यूजनुसार, त्यांनी इलेक्टोरल कॉलेजचा 270 मतांचा आवश्यक असलेला आकडा जवळपास गाठला आहे. मात्र, निवडणुकीचा निकाल अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. 78 वर्षीय ट्रम्प हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीबरोबरच वैयक्तिक आयुष्यासंदर्भातही चर्चेत राहतात. त्यांना चार भाऊ-बहिणी होते. टम्प यांनी तीन लग्न केले असून त्यांना पाच मुलं आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आईचे नाव मेरी तर वडिलांचे नाव फ्रेडरिक ट्रम्प होते. त्याच्या आईचा जन्म स्कॉटलंडमध्ये आणि वडिलांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. मेरी आणि फ्रेडरिक यांना पाच मुले होती. यात ट्रम्प यांचा चौथा क्रमांक. ट्रम्प यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी. त्यांच्या एका भावाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या दोन बहिणींची नावे मारियान आणि एलिझाबेथ अशी आहेत. तर फ्रेड ज्युनियर आणि रॉबर्ट अशी त्याच्या भावांची नावे आहेत. ट्रम्प यांच्या भावंडांनीही वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवला आहे.
ट्रम्प यांच्या पत्नी आणि मुले - डोनाल्ड ट्रम्प यांनी 1949 मध्ये मॉडेल इव्हानाशी पहिले लग्न केले. त्यांना इव्हाना पासून डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर, इवांका ट्रम्प आणि एरिक अशी तीन मुले आहेत. त्यांनी 1949 मध्ये लग्न केले आणि 1962 मध्ये घटस्फोट झाला. इव्हानापासून घटस्फोट घेतल्यानंतर ट्रम्प यांनी 1963 मध्ये अमेरिकन अभिनेत्री मार्ला मॅपल्सशी लग्न केले. डोनाल्ड आणि 55 वर्षीय मारला यांना 23 वर्षांची मुलगी टिफनी आहे. डोनाल्ड आणि मार्ला यांचाही 1999 मध्ये घटस्फोट झाला. नंतर, डोनाल्ड यांनी 2005 मध्ये मेलानियाशी लग्न केले. मेलानिया सध्या त्याच्या पत्नी आहेत. स्लोव्हेनियामध्ये जन्मलेल्या 49 वर्षीय मेलानिया, या पूर्वी मॉडेल होत्या. डोनाल्ड आणि मेलानिया यांना बॅरन नावाचा एक 13 वर्षांचा मुलगाही आहे.
अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष असतील -ट्रम्प आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होत आहेत. ते अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष असतील. रिपब्लिकन पक्षाने 2015 मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत विजय मिळवला होता. मात्र, 2020 मध्ये ते पराभूत झाले होते. आता 2024 मध्ये ते पुन्हा विजेयी झाले आहेत.