वॉशिंग्टन : अमेरिकेने रशियन हॅकरची माहिती देणाऱ्याला तब्बल तीस लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिकी प्रशासनाने सायबर गुन्ह्याप्रकरणी एखाद्या आरोपीच्या शिरावर ठेवलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे बक्षीस आहे. एवढे मोठे बक्षीस ठेवण्यामागचे कारणही तेव्हढेच मोठे आहे. कारण, हा हॅकर साधासुधा नसून तब्बल १०० दशलक्ष डॉलरच्या आॅनलाईन चोरीचा सूत्रधार आहे. इव्हगेनिय बोगोचेव्ह असे या हॅकरचे नाव असून त्याला पकडण्यासाठी अमेरिका जंगजंग पछाडत आहे. (वृत्तसंस्था)
रशियन हॅकरच्या शिरावर ३० लाख डॉलरचे बक्षीस
By admin | Published: February 25, 2015 11:49 PM