वॉशिंग्टन : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला मेक्सिकन सीमेवर ३० फूट उंच भिंत बांधायची आहे. उत्तर दिशेकडून ही भिंत छान दिसेल परंतु ती चढून येणे किंवा ती फोडणे अवघड असेल, असे सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेल्या कंंत्राटाच्या दोन नोटिसांत म्हटले आहे. मेक्सिकोच्या सीमेवर मोठी, सुंदर भिंत बांधण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात दिले होते. या नोटिसा शुक्रवारी कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शननेजाहीर केल्या. देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेला विभाग या भिंत बांधण्याच्या प्रकल्पावर देखरेख ठेवेल व भिंतीवर पहारा ठेवून देखभालही करील. ही भिंत भरीव क्राँक्रिटची असावी आणि आरपार दिसेल अशी असावी, असे दोन प्रस्ताव कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शनने या करारात मांडले आहेत. या दोन्ही प्रस्तावात ही भिंत जमिनीत किमान सहा फूट असावी आणि पादचारी व वाहनांसाठी २५ व ५० फूट स्वयंचलित दारे असावीत, असे म्हटले. ही भिंत हातोडा, घन, छिन्नी, बॅटरी आॅपरेटेड साधनांनी वा इतर कोणत्याही हत्यारांनी फोडायची ठरवले तरी एक तास लागेल अशी तिची रचना अपेक्षित आहे.
मेक्सिकन सीमेवर अमेरिका बांधणार ३० फूट उंच भिंत
By admin | Published: March 20, 2017 12:46 AM