न्यूयॉर्क : एक प्रकारची खिलाडू भावना निर्माण व्हावी या उद्देशाने येथील लष्करी अकादमीत खेळविण्यात आलेल्या ‘पिलो फाईट’ या प्रकारात किमान ३० जण जखमी झाले.न्यूयॉर्कच्या पश्चिम भागात असलेल्या लष्करी अकादमीत उन्हाळ्याच्या अखेरीस अशा प्रकारची लढत ठेवली जाते. यावेळची लढत रक्तरंजित ठरली. या लढतीत सहभागी होणाऱ्यांनी ‘पिलो’मध्ये हेल्मेट आणि अन्य काही कठीण वस्तू आणल्याने लष्करी अकादमीतील ३० कॅडेटस् जखमी झाले. या अकादमीत लष्कराचे अत्यंत कठीण असे प्रशिक्षण दिले जाते.आणि सरकारी निधीतून या अकादमीचा खर्च केला जातो. या अकादमीतच झालेल्या लढतीत हा प्रकार घडला. जखमींपैकी २४ जण बेशुद्ध पडले. त्यांना रुग्णवाहिकेतून इस्पितळात नेण्यात आले. या प्रकारात काही जणांच्या खांद्याला, तर काहींच्या पायाला जखमा झाल्या, हाडे मोडली. विशेष म्हणजे अकादमीतर्फे या घटनेची कुठेही वाच्यता करण्यात आली नाही.२० आॅगस्ट रोजी हा प्रकार घडल्याचे सोशल मीडियावरून प्रसारित झाले. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांत खेळीमेळीचे नाते निर्माण व्हावे या दृष्टीने हा वार्षिक खेळ आयोजित केला जातो, असे अकादमीचे लेफ्ट. कर्नल ख्रिस्तोफर कॅसकर म्हणाले.
‘पिलो फाईट’मध्ये ३० जखमी
By admin | Published: September 06, 2015 4:06 AM