शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
3
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
4
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
5
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
6
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
7
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
8
विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम
9
शेअर बाजारात सलग दुसऱ्या घसरणीसह सुरुवात; Nifty च्या 'या' स्टॉक्समध्ये जोरदार विक्री
10
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
11
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
12
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
14
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
15
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
16
बार्शीत ५ जरांगे-पाटील समर्थकांची माघार; एकजण मात्र दिवसभर नॉटरिचेबल!
17
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
18
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
19
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
20
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?

हार्वे वादळात ३० जणांचा मृत्यू, लाखभर भारतीय पूरग्रस्त टेक्सासमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 2:54 AM

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण वादळ असलेल्या हार्वे वादळामध्ये टेक्सास प्रांतात ३० जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेघर झाले आहेत.

ह्युुस्टन : अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण वादळ असलेल्या हार्वे वादळामध्ये टेक्सास प्रांतात ३० जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेघर झाले आहेत. ह्युस्टन शहरात लुटमार वाढली आहे. त्यामुळे तेथे रात्रीच्या काळी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. जवळपास एक लाख अमेरिकन भारतीय सध्या वादळ आलेल्या टेक्सास प्रांतात राहतात. तेही या वादळात अडकले आहेत.या वादळाचा लाखो लोकांना तडाखा बसला आहे. मदतकार्य करण्याºया हजारो टीम सध्या रहिवाशांना वाचविण्यासाठी अविरत काम करीत आहेत.वादळाच्या काळात आलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूर आला असून, येत्या काळातही आणखी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आलाआहे.शुक्रवारपासून आलेल्या पुरात अनेक जण वाहून गेल्याची भीती आहे. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढू शकते, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. आतापर्यंत १३ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यूहार्वे वादळामुळे एका २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ह्युस्टन येथे या वादळात आतापर्यंत २०० विद्यार्थी अडकलेले आहेत.टेक्सासच्या ए अँड एम विश्वविद्यालयात निखिल भाटिया शिकत होता. तो आपल्या मैत्रिणीसोबत शनिवारी ब्रायन तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या मैत्रिणीची प्रकृती गंभीर आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाºयांनी सांगितले की, निखिल भाटियाच्या घरच्यांशी आम्ही संपर्कात आहोत.तसेच त्याच्या मैत्रिणीला ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, त्यांच्याशीही संपर्क ठेवून होतो. निखिल भाटिया हा मूळचा जयपूरचा आहे, तर त्याची मैत्रीण शालिनी सिंह नवी दिल्ली येथील रहिवासी आहे.