व्हर्जिनिया: अमेरिकेतील एका 30 वर्षे जुन्या चर्चच्या जागी आता मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. व्हर्जिनियाच्या पोट्समाऊथमधील चर्चच्या जागेवर आता स्वामीनारायण हिंदूमंदिराची निर्मिती केली जाणार आहे. या चर्चला आता मंदिराचं स्वरुप दिलं जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. स्वामीनारायण संस्थेकडून खरेदी करण्यात आलेलं हे अमेरिकेतील सहावं आणि जगातील नववं मंदिर असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. लवकरच या ठिकाणी स्वामीनारायण मंदिर उभारण्यात येईल. व्हर्जिनियाच्या आधी कॅलिफोर्निया, लुधसविले, पेनिनसिल्वेनिया, लॉस एँजेलिस, ओहियोमधील चर्चच्या जागी मंदिरांची उभारण्यात करण्यात आली आहे. इंग्लंडमधील लंडन आणि बोल्टन, कॅनडातील टोरंटोमध्येही चर्चच्या जागी मंदिरं उभारण्यात आली आहेत. संस्थेचे आध्यात्मिक प्रमुख पुरुषोत्तमप्रियदास स्वामी यांच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकेतील 30 वर्षे जुन्या चर्चच्या जागी मंदिराची उभारणी केली जाणार असल्याची माहिती महंत भगवतप्रियदास स्वामींनी दिली. व्हर्जिनियातील हे हरिभक्तांसाठीचं पहिलं मंदिर असेल. मंदिराची उभारणी करण्यासाठी फार बदल करण्याची गरज भासणार नाही. कारण चर्चमध्ये आधीपासूनच अन्य धर्मांसाठी आध्यात्मिक जागा उपलब्ध होती, असं भगवतप्रियदास स्वामींनी सांगितलं.
30 वर्षे जुन्या चर्चची खरेदी; आता होणार मंदिराची उभारणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 4:31 PM