शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये मारले गेले ३०० दहशतवादी, पाकिस्तानच्या माजी अधिकाऱ्याने अखेर दिली कबुली

By बाळकृष्ण परब | Published: January 09, 2021 8:52 PM

Balakot Air Strike News : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर जोरदार हवाई हल्ला केला होता. मात्र या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले याबाबत सुरुवातीपासूनच वेगवेगळे आकडे समोर येत होत होते.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितला बालाकोटमध्ये मारल्या गेलेल्यांचा खरा आकडा भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० लोक मारले गेले होतेपाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका टीव्ही शोमध्ये दिली कबुली

इस्लामाबाद - पुलवामा येथे पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर जोरदार हवाई हल्ला केला होता. मात्र या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले याबाबत सुरुवातीपासूनच वेगवेगळे आकडे समोर येत होत होते. त्यातच भारताच्या हल्ल्यात एकही नागरिक मारला गेला नसल्याचे सांगत पाकिस्तानने कांगावा केला होता. दरम्यान, या हल्ल्याला दोन वर्षे उलटत असतानाच पाकिस्तानच्या एका माजी अधिकाऱ्याने बालाकोटमध्ये मारल्या गेलेल्यांचा खरा आकडा सांगितले आहे.भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० लोक मारले गेले होते, अशी कबुली पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने दिली आहे. पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका टीव्ही शोमध्ये २६ फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या एअरस्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेल्याचे मान्य केले.आगा हिलाली हे वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत नेहमीच भाग घेत असतात. तसेच पाकिस्तानी सैन्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र यावेळी त्यांनी भारतीय हवाई दलाच्या पराक्रमामुळे पाकिस्तान आणि पाकिस्तानी लष्करावर ओढवलेल्या नामुष्कीची कबुली दिली आहे.खैबर पख्तुनख्या प्रांतातील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ आहे. भारतीय हवाई दलाने या तळाला लक्ष्य केले होते. मात्र त्यावेळी आपली फजिती लपवण्यासाठी पाकिस्तानने या तळावर कुणी उपस्थित नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर भारतातही अनेकांनी या एअरस्ट्राइकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्याबाबत शंका उपस्थित केली होती.आगा हिलाली पुढे म्हणाले की, भारताने आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे झेपावत युद्धसदृश कारवाई केली होती. यामध्ये किमान ३०० जण मारले गेल्याचे वृत्त होते. मात्र आमचे लक्ष्य वेगळे आहे. आम्ही त्यांच्या हायकमांडना लक्ष्य करतो. तेच आमचे अचूक लक्ष्य आहे. तेव्हा आम्ही सांगितले होते की, सर्जिकल स्ट्राइकमध्ये कुणाचाही मृत्यू झालेला नाही. आता आम्ही सांगितले की, ते जे काही करतील त्याला आम्हीसुद्धा त्याच स्तरावर उत्तर देऊ.

 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान