अबुजा : नायजेरियातील योला येथील गर्दी असलेल्या बाजारात शक्तिशाली बॉम्बस्फोट होऊन किमान ३२ जण ठार आणि अन्य ८० जण जखमी झाले. स्थानिक वेळेनुसार रात्री ८.२० वाजता ही घटना घडली. काही दिवसांपूर्वीच अध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांनी या भागाला भेट देऊन बोको हराम ही अतिरेकी संघटना पराभवाच्या जवळ असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर लगेचच हा स्फोट झाला. या स्फोटाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही; तथापि त्यामागे बोको हराम ही संघटनाच असल्याचा संशय आहे. या देशात गेल्या सहा वर्षांत बोको हरामने केलेल्या हिंसाचारात १७ हजारांपेक्षा अधिक लोक ठार झाले.
नायजेरियातील स्फोटात ३२ ठार
By admin | Published: November 19, 2015 3:28 AM