ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 2 - नैऋत्य चीनमधील कोळसा खाणी झालेल्या स्फोटात 33 जण ठार झाले. सोमवारी कोळसा खाणी झालेल्या स्फोटानंतर हे कामगार खाणीत अडकले होते. दरम्यान आज त्यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली.
चीनच्या योंगचून जिल्ह्यातील चाँगकिन पालिका क्षेत्रातील लौसा टाऊन येथे असलेल्या जिंशांगोऊ या खाजगी खाणीमध्ये सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास स्फोट झाला होता. त्यानंतर खाणीत काम करत असलेले 35 कामगार खाणीत अडकले होते. अडकलेल्या कामगारांपैकी दोघे जण बचावले, तर उर्वरित 33 जणांचा मात्र मृत्यू झाला.