शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
2
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
3
संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
4
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
5
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
6
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
7
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
8
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
9
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
10
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
13
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी
14
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
15
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
16
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
17
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
18
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
19
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
20
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."

सौदी अरेबियात भीषण बस अपघात, 35 परदेशी प्रवाशांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 10:23 AM

भीषण बस अपघातात 35 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 4 जण जखमी झाले आहेत.

रियाध (सौदी अरेबिया) - सौदी अरेबियातील पवित्र धार्मिक शहर असलेल्या मक्का येथे झालेल्या भीषण बस अपघातात 35 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले सर्व प्रवासी परदेशी नागरिक असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पोलिसांनी या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपासास सुरुवात केली आहे. 

सौदीमधील सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला असून, 4 जण जखमी झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता पवित्र शहर असलेल्या मक्काला जोडणाऱ्या मदिना येथे हा भीषण अपघात झाला. बस आणि कार यांच्यातील घडकेमुळे हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमधून आशियाई आणि अरब नागरिक प्रवास करत होते, अशी माहिती सरकारी वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने दिली आहे.  हा अपघात इतका भीषण होता की, ज्यामुळे टक्कर झाल्यानंतर दोन्ही वाहनांना आग लागली.

 दरम्यान, पोलिसांनी दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपासास सुरुवात केली आहे. मात्र पोलिसांना अपघाताचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. हा अपघात मदिनापासू 170 किमी दूर  हिजरा रोडवरील अल अखल गावाजवळ झाला. आपघातग्रस्त बसमधून 39 प्रवासी प्रवास करत होते.  त्यापैकी 35 जाणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

टॅग्स :Accidentअपघातsaudi arabiaसौदी अरेबिया