काठमांडू : नेपाळमध्ये कुमारवयीन मुलीची १५० रुपये आणि रेडिओ संचासाठी भारतीय तस्करांच्या मध्यस्तीने विक्री करणाऱ्या महिलेस ३५ वर्षांनंतर शिक्षा सुनावण्यात आली. येथील न्यायालयाने या महिलेस १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.नेपाळच्या डाड जिल्ह्यातील केशरी सरकिनी या महिलेला शेजारच्याची मुलगी विकल्याच्या आरोपावरून १९८० मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. मुलीची विक्री करण्यात आली तेव्हा ती १९ वर्षांची होती, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी केशरीसह तीन जण दोषी आढळले होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा फरार आहे. (वृत्तसंस्था)
दीडशे रुपयांत मुलीस विकणाऱ्या महिलेला ३५ वर्षांनंतर शिक्षा
By admin | Published: February 28, 2015 12:35 AM