ऑनालाइन लोकमतबँकॉक, दि. 9 - आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यामुळे एवढी मोठी शिक्षा असते याचा कोणी विचारही करु शकणार नाही. पण थायलंडमधील एका व्यक्तीला आपली फेसबुक पोस्ट चांगलचीच महागात पडली आहे. रॉयल फॅमिलीबदद्ल अक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी न्ययालयाने या व्यक्तीला 35 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. थायलंड येथे एका 34 वर्षी व्यक्तीने रॉयल फॅमिलीचे फोटो आणि व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी कोर्टाने त्याला 10 गुन्ह्यात दोषी ठरवत 35 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीचे नाव विचो असून त्याने आपल्या अकांटचा वापर करुन अशा पद्धतीची पोस्ट केल्याचा दावा कोर्टात केला आहे. यापूर्वी मित्राच्या पेसबुक अकांटवरुन अक्षेपार्ह पोस्ट केल्याचा गुन्हा त्याच्यावर आहे. शाही कुटुंबबाची मानहानी करणे त्यांचे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या पोस्टद्वारे केला गेला. त्यामुळे त्या व्यक्तीविरोधात मानहानीचा दावा दाखल केला गेला. असे शाही कुटुंबाची मानहानीची प्रकरणे पाहणाऱ्या आईलॉ ग्रुपने सांगितले. आईलॉचे यिंग्चिप एटानानॉनने सांगितले की, आरोपीला प्रत्येक गुन्ह्यासाठी सात वर्षाची शिक्षा सुनावली होती. अशा प्रकारे कोर्टाने त्याला प्रथम 70 वर्षाची शिक्षा सुनावली होती पण न्ययालयाने त्याची शिक्षा कमी करत त्याला 35 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्याने आपले सर्व गुन्हे कबुल केल्यामुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आली.
आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळे 35 वर्ष तुरुंगवास
By admin | Published: June 09, 2017 8:35 PM