हनोई- उत्तर आणि मध्य व्हिएतनाममध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून झालेल्या भूस्खलनात जवळपास 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूस्खलनात 40हून अधिक लोक बेपत्ता झालेत. परंतु बेपत्ता लोकांबद्दल अद्यापही कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. पुरामुळे व्हिएतनामचा उत्तर प्रांत प्रभावित झाला आहे.व्हिएतनाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण घटनास्थळी दाखल झालं असून, बचावकार्य राबवत आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 1000हून जास्त घरं नेस्तनाबूत झालीत. तसेच 6 प्रांत पूर्णतः प्रभावित झालीत. उत्तर आणि मध्य क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती उद्भवली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पाऊस पडल्यानं व्हिएतनामचे कृषिमंत्री नागुएन जुआन यांनी सांगितलं आहे.
व्हिएतनाममध्ये झालेल्या भूस्खलनात 37 लोकांचा मृत्यू, 40 जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 1:35 PM