नायजेरियामध्ये भीषण अपघात झाला आहे. तीन बसेसची धडक होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 37 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मैदुगुरी शहरात हा अपघात झाला आहे. दोन बसेसची समोरासमोर धडक झाल्यानंतर आगीचा भडका उडाला होता. याचवेळी तिसऱ्या बसने अपघातग्रस्त बसेसना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
बोर्नो राज्याच्या रस्ते सुरक्षा एजन्सीचे प्रमुख उत्तेन बोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त बसमधून अनेक प्रवासी प्रवास करत होत्या. दोन्ही बस वेगात असताना एका बसचालकाचं नियंत्रण सुटलं आणि समोरुन येणाऱ्या बसवर आदळली. बस वेगात असल्याने अपघातानंतर आगीचा भडका उडाला होता.दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. अधिक तपास सुरू आहे.
आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र सर्व मृतदेह हे पूर्णत: जळाल्याने मृतांची ओळख पटवणं अवघड झालं आहे. मैदुगुरूपासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या जकाना गावाजवळ हा अपघात झाला. ज्यावेळी बसची जोरदार धडक झाली. तेव्हा एका बसचा टायर हा फुटला होता आणि त्याने समोरून आलेल्या बसला जोरदार धडक दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"