नवी दिल्ली : पाकिस्तानच्या दुर्गम बलुचिस्तान प्रांतात रविवारी वेगवान प्रवासी बस पुलाच्या खांबाला धडकून दरीत कोसळल्याने 39 जण जागीच ठार झाले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. लासबेला सहाय्यक आयुक्त हमजा अंजुम यांनी सांगितले की, 48 प्रवासी घेऊन ही बस क्वेटाहून कराचीला जात होती. सहाय्यक आयुक्त अंजुम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ही बस लासबेला परिसरातून अतिवेगाने जात असताना हा अपघात झाला.
दरम्यान, लासबेलाजवळ यू-टर्न घेत असताना वेगाने जात असलेली बस पुलाच्या खांबाला धडकली आणि आग लागली. तीन जणांना वाचवण्यात यश आले असले तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. एक मूल आणि एका महिलेसह केवळ तीन जणांना जिवंत वाचवता आले, असे स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले आहे. इधी फाऊंडेशनचे साद इधी यांनी सांगितले की, अपघातस्थळावरून आतापर्यंत 17 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हमजा अंजुम यांनी सांगितले की, बसमधील एक लहान मूल आणि एका महिलेसह तीन जणांना जिवंत वाचवण्यात आले आहे. तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"