उत्तर जॉर्जिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका हायस्कूलमध्ये बुधवारी सकाळी गोळीबार झाल्याची घटना समोर आली. या गोळीबारात चार जण ठार झाले आणि नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बाईsss! अग्निशमन दलाचे कर्मचारी दिसायचे 'हॉट', तिने दोनवेळा शेताला मुद्दाम लावली आग
मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेल्यांमध्ये दोन विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका १४ वर्षीय मुलाला अटक केली आहे, जो तेथील विद्यार्थी आहे. राजधानी अटलांटापासून ७० किमी अंतरावर असलेल्या विंडर शहरातील एका शाळेत ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता हल्लेखोराने आत्मसमर्पण केले आणि जमिनीवर पडून राहिला. सीएनएनच्या वृत्तानुसार, या घटनेत ठार झालेल्यांमध्ये २ शिक्षक आणि २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचे नाव कोल्ट ग्रे असे आहे. आता त्याच्यावर प्रौढांप्रमाणे खटला चालवला जाईल. पोलिसांना यापूर्वीही हल्लेखोराच्या कारवायांचा संशय होता. गेल्या वर्षी मे महिन्यात एफबीआयने कोल्टच्या कुटुंबीयांची चौकशी केली.
त्यानंतर त्याने सोशल मीडियावर सामूहिक गोळीबार करण्याची धमकी दिली होती. तरीही त्याला अटक झाली नव्हती. त्यानंतर कोल्टच्या वडिलांनी असा युक्तिवाद केला की त्याच्याकडे शिकारीची बंदूक आहे जी तो नेहमी पाळत ठेवतो.
"जॅक्सन काउंटीने स्थानिक शाळांना या प्रकरणावर लक्ष ठेवण्यासाठी सतर्क केले आहे. त्य वेळी, स्थानिक, राज्य किंवा फेडरल स्तरावर अटक करण्यासाठी किंवा कोणतीही अतिरिक्त कायदा अंमलबजावणी कारवाई करण्याचे कोणतेही संभाव्य कारण नव्हते. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या सर्व नऊ जणांवर गोळीबार झाला होता.