कराची : पाकिस्तानने कराची येथील एका कारागृहातून 40 भारतीय कैद्यांची सुटका केली. यातील बहुतांश कैदी मच्छीमार आहेत, अशी माहिती अधिका:यांनी दिली. कराची येथील मलिर तुरुंगातून त्यांची मुक्तता करण्यात आली आहे.
नेपाळमधील सार्क शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी हस्तांदोलन व सुहास्य वदनाने परस्परांशी संभाषण केल्याच्या दुस:या दिवशी कराचीच्या मालिर कारागृहातून भारतीय कैद्यांची सुटका करण्यात आली. (वृत्तसंस्था)