शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

इराकमध्ये ४० भारतीयांचे अपहरण ?

By admin | Published: June 18, 2014 9:34 AM

इराकमध्ये दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा फटका आता भारतीयांनाही बसू लागला आहे. मोसूल येथे एका प्रकल्पावर काम करणा-या ४० भारतीयांची दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन टीम
बगदाद, दि. १८- इराकमध्ये दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा फटका आता भारतीयांनाही बसू लागला आहे. मोसूल येथे एका प्रकल्पावर काम करणा-या ४० भारतीयांची दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचे वृत्त आहे. मात्र या सर्वांशी सध्या संपर्क होत नसून ते बेपत्ता झाले आहेत अशी सावध प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 
इराकमध्ये शिया सरकार व सुन्नी जिहाद्यांमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून यामुळे इराकमधील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल -शाम  (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेने अनेक शहरांवर ताबा मिळवला आहे. तेल विहीरींची नैसर्गिक देणगी लाभलेल्या मोसूल शहरावरही आयएसआएस या संघटनेने ताबा मिळवला आहे. मोसूलमध्ये भारतातील ४० कर्मचारी एका बांधकाम साईटवर काम करत होते. यासर्वांचे दहशतवाद्यांनी अपहरण झाल्याचे इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र या नागरिकांशी अद्याप संपर्क झालेला नसून ते बेपत्ता आहे. त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे परराष्ट्रमंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, भारतीय नागरिकांच्या अपहरणाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसून अपह्रत नागरिकांच्या सुटकेसाठी कोणती मागणीही करण्यात आलेली नाही.