बैरुत : पूर्व सिरियातील देर इजोर या शहरावर ‘इसिस’च्या अतिरेक्यांनी कब्जा करून महिला आणि मुलांसह ४०० नागरिकांचे अपहरण केले.सिरियन ‘आॅब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राईटस्’ने ही माहिती दिली आहे. या मानवाधिकार संघटनेतर्फे जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘देर इजोर’ या शहरावर इसिसच्या अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर शहराच्या उत्तर-पश्चिम क्षेत्रावर कब्जा केला. या भागातील अल बागलियेह येथून कमीत कमी ४०० नागरिकांचे अपहरण केले. संघटनेचे प्रमुख रमी अब्दुल रहेमान म्हणाले की, अपहरण करण्यात आलेल्या नागरिकांत महिला, मुले आणि सरकार समर्थक गनीम यांचा समावेश आहे. त्यांचे अपहरण करून ‘इसिस’चे नियंत्रण असलेल्या प्रदेशात नेण्यात आले आहे.
पूर्व सिरियात इसिसकडून ४०० नागरिकांचे अपहरण
By admin | Published: January 18, 2016 3:40 AM