वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा घेतलेला निर्णय आता चांगलाच आंगलट येताना दिसत आहे. अमेरिकेतील शाळा आणि महाविद्यालये खुली केल्यापासून आतापर्यंत देशातील 24 राज्यांतील महाविद्यालयांतून कोरोना संक्रमित रुग्ण समोर आले आहेत. संक्रमित होणाऱ्यांमध्ये 3300 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर एकट्या मिसीसिपी राज्यात जवळपास 4 हजार विद्यार्थी आणि 600 शिक्षकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
मिसीसिपी येथे केवळ 17 ते 21 ऑगस्टदरम्यान शाळांत शिकवणाऱ्या 144 शिक्षकांना आणि 292 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील आरोग्य अधिकारी डॉ. थॉमस ई डॉब्स यांनी सांगितले, की 31 शाळांतून संक्रमित प्रकरणे समोर आली आहेत. हे लक्षात घेत, या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थांना आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये वर्ग सुरू झाल्यानंतर साधारणपणे एका आठवड्यात कोरनाची लागण झालेले 566 प्रकरणे समोर आली आहेत. मार्च महिन्यातील सुट्ट्यांनंतर गेल्या आठवड्यात 20 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात यायला सुरुवात केली होती.
दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने दक्षिण कोरियातील सियोल येथे 11 सप्टेंबरपर्यंत शाळा बंद करण्यात आल्या आहेत. येथे दोन आठवड्यात 200 मुले आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे
प्लाझ्मा थेरेपीसंदर्भातही ट्रम्प यांना झटका -वैद्यकीय तज्ज्ञांचा विरोध असतानाही, फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशनचे (FDA) आयुक्त, स्टीफन हेन यांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या प्लाझ्माचे उपचारातील फायदे अतिरंजकपणे सांगितल्याबद्दल मंगळवारी माफी मागितली आहे. ट्रम्प यांनी रविवारी घोषणा केली होती, की FDA ने कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारासाठी प्लाझ्माचा वापर करण्यासंदर्भात तत्काळ परवानगी दिली आहे.
ट्रम्प यांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले होते. मात्र, उपचाराची गुणवत्ता अद्याप स्पष्ट झालेली नाही. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनापूर्वी ट्रम्प यांनी ही घोषणा केली. यामुळे, कोरोना महामरीविरोधत लढण्याच्या पद्धतीवरून त्यांच्यावर होत असलेल्या टीकेवरील लक्ष हटवण्यासाठी तर त्यांनी असा निर्णय घेतला नसावा, अशी शंकाही व्यक्त केली गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्ट नसल्याचा दावा
CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात
ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!