शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 10:45 AM

इस्त्रायलने हमासवर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात हल्ले केले, यात अनेकांना मृत्यू झाला. पण अजूनही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही.

गेल्या काही महिन्यांपासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात अनेकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या क्रूर हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने इस्रायलने १० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. हमासने गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर अचानक हल्ला केला होता.  या हल्ल्यात १२०० हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आणि हमासने मुले आणि महिलांसह सुमारे २५० लोकांना ओलीस ठेवले. हमासने या हल्ल्याला ऑपरेशन अल-अक्सा फ्लड असे नाव दिले.

इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल

इस्रायलने या हल्ल्याचा बदला घेतला. त्यांनी गाझामध्ये ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स केले. त्यांच्या सैन्याने गाझाला अवशेष बनवले. गेल्या एका वर्षात गाझामध्ये इस्रायलच्या कारवाईमुळे सुमारे ४१,००० मृत्यू झाले आहेत, गाझामधून लाखो लोक बेघर झाले आहेत. इस्रायलने आतापर्यंत इस्माईल हनिया आणि मोहम्मद डेफ यांच्यासह हमासच्या अनेक प्रमुख नेत्यांना ठार केले आहे. २००८ पासून पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षातील हे पाचवे युद्ध आहे आणि १९७३ मधील योम किप्पूर युद्धानंतर या प्रदेशातील सर्वात मोठे लष्करी ऑपरेशन आहे.

गाझा पट्टीवर २००७ पासून हमासचे राज्य आहे आणि ७ ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईमुळे येथे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. गाझामधील पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आहे. हमासचे अनेक प्रमुख नेते आणि कमांडर मारल्यानंतर सक्रिय आहेत. कतार-आधारित हमास सदस्य खलील अल-हया यांनी 7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्याला 'महान कृत्य' म्हणून संबोधत व्हिडिओ संदेश जारी केला. गाझा आणि आमचे पॅलेस्टिनी नागरिक शत्रूविरूद्ध प्रतिकार करून एक नवा इतिहास लिहित आहेत," अल-हया यांनी ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या वर्ष पूर्ण झाले या निमित्त जारी केलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे.

७ ऑक्टोबर २०२४ रोजी हमासच्या हल्ल्याची पहिला वर्धापन दिन जवळ येत असताना इस्रायल अनेक आघाड्यांवर युद्ध करत आहे. आता त्यांचे लक्ष गाझावरून लेबनॉनकडे वळले आहे. लेबनॉनच्या विविध भागात हिजबुल्लाला लक्ष्य करत इस्रायली लष्कराच्या जमिनीवरील कारवाई आणि हवाई दलाचे हवाई हल्ले सुरूच आहेत. गाझामध्ये ४१,००० हून अधिक मृत्यू होऊनही हा हिंसाचार कधीच संपणार नाही असे दिसते. इस्रायली संरक्षण दलांनी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी गाझा शहराच्या शेजारी असलेल्या जबलियामध्ये हमासच्या सैन्याविरोधात आणखी एक कारवाई सुरू केली. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्ध