ऑनलाइन लोकमत
दमिश्क, दि. ३१ - सिरियाची राजधानी असलेल्या दमास्कसजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ४५ जण ठार झाले तर, ११० जण गंभीर जखमी आहेत. दमिश्कच्या दक्षिण प्रांतात एका शिया धर्म स्थळाजवळ आज ३ बॉम्ब स्फोट झाले. माध्यमाकडून मिळालेल्या वृत्तानुसार ३ बॉम्ब स्फोटात ३० जण मृत झाल्याची खबर होती. येथे झालेल्या ३ शक्तिशाली स्फोटातील २ स्पोट हे आत्मघातकी होते तर एक कार मध्ये स्फोट झाला होता. यापुर्वी फेब्रुवारी २०१५ मध्ये याच धार्मीक स्थाळावर हल्ला झाला होता.