कैरो : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाने (इसिस) इजिप्तमधील तानता आणि अलेक्झांड्रिया शहरात चर्चेसमध्ये रविवारची प्रार्थना सुरू असताना केलेल्या दोन बाँबस्फोटांत ४५ जण ठार तर १४० जण जखमी झाले. देशातील अल्पसंख्य ख्रिश्चनांवर गेल्या काही वर्षांत झालेला हा भीषण हल्ला आहे. पहिला स्फोट येथून १२० किलोमीटरवरील तानता शहरात सेंट जॉर्ज चर्चवर झाला त्यात २५ जण ठार व ७१ जण जखमी झाले. हा हल्ला आत्मघाती हल्लेखोराने केल्याचे आणि एकाने चर्चमध्ये स्फोटक ठेवल्याचे सांगितले जाते. मृतांत तानता चर्चच्या प्रमुखांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर काही तासांनी अलेक्झांड्रिया मान्शिया जिल्ह्यातील सेंट मार्क्स कॉप्टिक आॅर्थोडोक्स कॅथेड्रल चर्चवर आत्मघाती हल्ला झाला.
इजिप्तमध्ये दोन स्फोटांत ४५ जण ठार
By admin | Published: April 10, 2017 12:56 AM