ढाका : बांगलादेशात रविवारी एका बोट अपघातात कमीत कमी ४८ जण मृत्यूमुखी पडले. क्षमतेहून अधिक प्रवासी असलेल्या या बोटीला धडक बसल्याने ती नदीत बुडाली. अपघातावेळी बोटीत सुमारे १५० प्रवासी होते. गेल्या १० दिवसांत दुसऱ्यांदा बांगलादेशात बोट बुडाल्याचा प्रकार झाला आहे.मानिकगंज जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दौलतदियाहून पटुरियाकडे बोट जात होती. एका मालवाहू बोटीला धडकून ती बुडाली. शिबालय येथील पोलीस स्टेशनचे प्रभारी रकीबुज्जमा यांच्या हवाल्याने वृत्त आहे की, बोट अपघातात कमीत कमी ४८ जण मृत्यूमुखी पडले. मृतांत सहा मुले आणि ११ महिलांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह पद्मा नदी पात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत. नेहमीचीच बाब!सुरक्षा मानकांकडे दुर्लक्षामुळे बांगलादेशात बोट बुडण्याचे प्रकारही एक सर्वसाधारण बाब झाली आहे. अलीकडे १३ फेब्रुवारी रोजी एक बोट बुडाली होती. यात कमीत कमी पाच जण मृत्युमुखी पडले होते. (वृत्तसंस्था)
बांगलादेशात बोट अपघातात ४८ ठार
By admin | Published: February 22, 2015 11:10 PM