न्यूयॉर्क - अमेरिकेत फ्लोरेंस वादळाने थैमान घातले आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका अमेरिकेतील उत्तरी कॅरोलाईना या राज्याला बसला आहे. तर अमेरिकेच्या पूर्व तटावरील अनेक राज्यातही मोठे नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत या वादळामुळे 11 जणांचा जीव गेला असून हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर, चीनमध्ये फिलिपाईन्स वादळाने शिरकाव केला असून या वादळाच्या तडाख्यात आत्तापर्यंत 49 लोकांचा जीव गेला आहे.
चीनच्या उत्तरी भागात मैंगकूट वादळामुळे फिलिपाईन्स येथे 49 जणांचा जीव गेला आहे. या वादळाच्या तडाख्यात फिलिंपींसचा लुजोन द्वीप नेस्तनाबूत झाला आहे. आता, हे वादळ चीनच्या पश्चिमेला धडक देत आहे. या वादळामुळे नद्यांचे पाणी गावात शिरले असून वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उखडून पडले आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून 42 ठिकाणी भूसख्खल झाले आहे. येथील जवळपास 50 लाख लोकांना या वादळाचा फटका बसला आहे. लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. राष्ट्रीय हवामान विज्ञान खात्याने या वादळाला यंदाच्या वर्षातील सर्वात मोठे वादळ असल्याचे म्हटले आहे.