अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय अनेकांना मान्य झालेला नाहीय. ट्रम्प विजयी होताच महिलांनी पुरुषांना दोषी ठरविण्यास सुरुवात केली आहे. तसेच ट्रम्प यांच्याविरोधात ४बी आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये ट्रम्प यांना विरोध करण्यासाठी नाते न ठेवणे, सेक्स न करणे, लग्न न करणे आणि मुलांना जन्म न देण्याची कोरियाई मोहिम सुरु केली आहे.
४बी आंदोलनाची सुरुवात दक्षिण कोरियात झाली होती. आता २०२४ मध्ये ट्रम्प जिंकल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ही एक सामाजिक आणि राजकीय चळवळ आहे. स्त्रीवाद आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना समान संधी देण्यावर ही मोहिम आधारित आहे.
कमला हॅरिसविरोधात लढताना ट्रम्प यांच्या पक्षाने महिला विरोधी प्रतिमा उभी केली होती. यामुळे ट्रम्प यांना पुरुषांनी जिंकवून दिले असा आरोप अमेरिकेतील या चळवळीत उतरत असलेल्या महिला करत आहेत. अनेक महिलांनी रडतानाचे व्हिडीओ पोस्ट करत या ४बी चळवळीत उतरत असल्याचे म्हटले आहे.
कोरियन भाषेत बी म्हणजे नाही असे आहे. मीटू नंतर हे आंदोलन कोरियात सुरु झाले होते. आता ते अमरिकेत जोर धरू लागले आहे. यानुसार या महिला पुरुषांना सेक्स करण्यास मज्जाव करणार आहेत, तसेच पुरुषांसोबत नातेसंबंध जोडणार नाहीत. तसेच लग्नही करणार नाहीत व डेटिंगवरही जाणार नाहीत, असा पवित्रा या महिलांनी घेतला आहे.