वॉशिंग्टन: प्रायव्हसीचा भंग करणे व ग्राहकांच्या डेटाचा दुरुपयोग करणे याबद्दल दोषी ठरवून अमेरिकी सरकारच्या संघीय व्यापार आयोगाने (एफटीसी) ‘फेसबूक’ला पाच अब्ज डॉलरचा दंड करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. कोणत्याही टेक्नॉलॉजी कंपनीस झालेला हा सर्वाधिक दंड आहे. याआधी सन २०१२ मध्ये ‘गूगल’ला अशाच प्रकारे २.२ कोटी डॉलर दंड झाला होता.‘फेसबूक’ किंवा ‘एफटीसी’ने याविषयी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. मात्र माहितगार सूत्रांनुसार पाच अब्ज डॉलर दंड भरून हे प्रकरण सामोपचाराने मिटविण्याचा ‘फेसबूक’ने सादर केलेला समझोत्याचा मसुदा आयोगाने ३ वि. २ बहुमताने मंजूर केला आहे.
फेसबूकला ५ अब्ज डॉलरचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 4:39 AM