वर्ल्ड बेस्ट स्कूल टॉप १० च्या यादीत देशातील पाच शाळांनी स्थान पटकाविले आहे. यामध्ये जिंकल्यास पहिल्या शाळेला थोडे थोडके नव्हेत तर अडीज लाख डॉलरचे बक्षिस मिळणार आहे. वर्ल्ड बेस्ट स्कूल अवॉर्डचे आयोजन युकेमध्ये करण्यात आले आहे. समाजाच्या प्रगतीमध्ये शाळांचे योगदान आणि जगभरातील शाळांना एक मोठे व्यासपीठ मिळण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.
जगातील सर्वश्रेष्ठ शाळांच्या यादीत वेगवेगळ्या कॅटेगरीतून १० शाळा निवडण्यात आल्या आहेत. सर्वात अभिमानाची बाब म्हणजे तीन शाळा या आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
प्रत्येक कॅटेगरीतील टॉप ३ शाळांची घोषणा या पुरस्कारातून करण्यात येणार आहे. ही घोषणा सप्टेंबरमध्ये होणार आहे. यानंतर विजेत्यांची घोषणा ऑक्टोबरमध्ये केली जाणरा आहे. पाच कॅटेगरींना पाच पुरस्कार मिळणार आहेत. अडीज लाख अमेरिकी डॉलर एवढी बक्षिसाची रक्कम पाच जणांमध्ये समान वाटून दिली जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक शाळेला 50,000 डॉलर मिळणार आहेत.
भारतातील कोणत्या शाळा स्पर्धेत आहेत....भारतातील शाळांमध्ये दिल्लीची सरकारी शाळा 'नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय (NPBV) F-ब्लॉक, दिलशाद कॉलोनी आहे. त्याच कॅटेगरीमध्ये मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशन स्कूल आहे. तिसरी शाळा ही गुजरातच्या अहमदाबादची रिव्हरसाईड स्कूल आहे. हे एक इंटरनॅशनल स्कूल आहे.
महाराष्ट्रातून आणखी दोन शाळा आहेत. यापैकी एक शाळा ही अहमदनगर जिल्ह्यातील आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल हे एचआयव्ही, एड्सग्रस्त आणि सेक्स वर्करांच्या कुटुंबातील मुलांना शिकवते. पाचवी शाळा ही मुंबईतील आकांक्षा फाउंडेशनची शिंदेवाड़ी मुंबई पब्लिक स्कूल आहे.