न्यूयॉर्क : अमेरिकेत विद्यार्थी व्हिसा आणि आर्थिक मदतीसंबंधी बनावट योजनांमध्ये सहभागी असलेल्याच्या आरोपाखाली पाच भारतीयांना अटक करण्यात आली आहे. विद्यार्थी व्हिसा फसवणूक आणि विद्यार्थ्यांना बनावट योजनांच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणी सुरेश हिरानंदाने त्यांचा मुलगा समीर, बहीण अनिता छाबडिया, मेहुणा ललित छाबडिया व सीमा शाह यांना अटक झाली आहे. येथील मॅनहॅटन संघीय न्यायालयात अमेरिकी न्यायाधीश गॅब्रिएल गोरेनस्टीन यांच्यापुढे या पाच आरोपींना सादर करण्यात आले. यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना पाच ते २० वर्षांची शिक्षा होऊ शकते. मॅनहॅटनचे सरकारी वकील प्रीत भरारा म्हणाले, प्रतिवाद्यांनी आपल्या खासगी शाळांच्या माध्यमातून सरकारची फसवणूक केली असून, विद्यार्थ्यांचे शोषण केले आहे. आरोपींनी खासगी आर्थिक लाभ योजनांसाठी व्हिसा आणि आर्थिक मदत नियमांशी निगडित शाळेची बनावट प्रमाणपत्रे तयार केली. तक्रारीनुसार पाचही आरोपी मायक्रोपॉवर करिअर इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ एज्युकेशन या संस्थांशी संबंधित आहेत. यांनी स्थलांतर अधिकार्यांनी सांगितले की, दोन्ही संस्था कायदेशीर आहेत. येथे परदेशी विद्यार्थ्यांना पूर्णवेळचे अभ्यासक्रम शिकविले जातात. शाळेत अधिक तर परदेशी विद्यार्थ्यांनी नियमानुसार वर्गात उपस्थिती लावली नाही. तसेच त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रतिवर्ष सुमारे १० हजार डॉलर एवढी रक्कम गोळा केली जाते, याबाबत त्यांनी अधिकार्यांना माहिती दिली नव्हती. (वृत्तसंस्था)
व्हिसा, आर्थिक फसवणूकप्रकरणी ५ भारतीय अटकेत
By admin | Published: May 31, 2014 6:17 AM