शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचे निवडणुकीचे गणित सर्वसामान्यांना महागात पडणार, कांदा 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता
2
"काँग्रेसच्या राज्यात गणतपतीजींनाच तुरुंगात टाकले जातेय, विघ्नहर्त्याच्या पूजेतही..."; PM मोदींचा हल्लाबोल
3
“होय, रात्री २.३० वाजता मनोज जरांगेंना भेटलो”; रोहित पवारांची कबुली, भुजबळांना दिले आव्हान
4
विनेश फोगाटचे आरोप हरिश साळवेंनी खोडले; काय घडले ते सांगितले, मोठा खुलासा करत म्हणाले...
5
"माझा राग देवेंद्रजींवर, कारण...", अखेर एकनाथ खडसेंनी सांगितला नेमका वाद काय?
6
भाजप आमदाराचा मोठा निर्णय, विधानसभा लढवण्यास नकार; धनंजय मुंडेंकडे बोट
7
पावसाच्या पाण्यात कार घालताय? एचडीएफसीच्या मॅनेजर, कॅशिअरचा बुडून मृत्यू
8
"भारतीय पुत्राचा अमेरिकेत अपमान, संविधान शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही..." PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात
9
“संजय राऊतांमुळे आनंद दिघेंना टाडा लागला”; शिंदे गटातील नेत्याने केला खळबळजनक दावा
10
Gold price : स्वस्त झाले की महागले, आठवडाभरानंतर 10 ग्रॅम सोन्याचे दर किती?
11
दररोज रिकाम्या असतात शेकडो सिट्स, या ट्रेनमुळे रेल्वेला होतोय कोट्यवधीचा तोटा
12
"कोणीही छाताड बडवून घेऊ नका, हे श्रेय गरीब मराठ्यांचे"; गॅझेट अंमलबजावणीवर जरांगे म्हणाले...
13
“नाथाभाऊंबाबत केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे मान्य, गणपतीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल”: फडणवीस
14
विमानतळावर अधिकाऱ्याच्या ‘गुड मॉर्निंग’ला प्रतिसाद देणं प्रवाशाला पडलं महागात, झाली थेट तुरुंगात रवानगी
15
'आमची मुलगी मार खायला गेलीये का?' निक्कीची आई भडकली, आर्याला बाहेर काढायची केली विनंती
16
नाथाभाऊंच्या भाजपा प्रवेशाबाबत गिरीश महाजन थेट बोलले; म्हणाले, “फटाके फोडून स्वागत करु”
17
स्वामी महाराजांना नवस कसा करावा? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच; ३ नियम अवश्य पाळायला हवेत
18
मोठी बातमी! ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी १६ ऐवजी, १८ सप्टेंबरला; महाराष्ट्र सरकारचा निर्णय
19
Asian Champions Trophy: पाकनं खेळला रडीचा डाव! करेक्ट कार्यक्रम करत भारतीय संघानं पुन्हा दाखवली जागा
20
हरियाणात दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसची जोरदार रणनीती, या तीन नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

नववर्षात बांगलादेशात हल्ल्याचा कट रचणा-या 5 संशयितांना अटक

By admin | Published: December 28, 2016 3:51 PM

हल्ल्याचा कट रचणा-या 5 संशयितांना अटक केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या पोलीस प्रमुखांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमतढाका, दि. 28 - बांगलादेशमध्ये नववर्षाच्या जल्लोषादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा कट रचणा-या 5 संशयितांना अटक केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या पोलीस प्रमुखांनी दिली आहे. हे संशयित जमात- उल- मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या 5 संशयित दहशतवाद्यांना काही दिवसांपूर्वी जुलै महिन्यात ढाका येथे झालेल्या कॅफे हल्ल्यातही दोषी ठरवण्यात आलं आहे. ढाका येथे कॅफेमध्ये झालेल्या हल्ल्यात त्यावेळी 22 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र आता तेच दहशतवादी नववर्षात पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याचं दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस प्रमुख मोनिरुल इस्लाम यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांकडून 60 किलोची स्फोटकं जप्त केली आहेत. ढाकामध्ये पोलिसांनी रात्रभर घातलेल्या छाप्यात या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून 1 जानेवारी 2017पर्यंत बाहेर कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, दिवसेंदिवस बांगलादेशात दहशतवादी हल्ले वाढत चालले आहेत. हल्ल्यात उदारमतवादी लेखक आणि धार्मिक अल्पसंख्याक सदस्यांना ठार करण्यात आलं आहे. जमात- उल- मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना इसिस या दहशतवादी संघटनेप्रति निष्ठा ठेवत असल्याचीही माहिती मोनिरुल इस्लाम यांनी दिली आहे. कॅफे हल्ल्याची जबाबदारी इसिसने (इस्लामिक स्टेट) स्वीकारली होती. त्यावेळी 8 ते 10 दहशतवाद्यांनी कॅफेत घुसून बेछूट गोळीबार केला होता.