कोट्टयाम : ५0 पेक्षा जास्त महिलांचे लैंगिक शोषण करणाºया एका २५ वर्षीय इसमाला केरळात अटक करण्यात आली. फेसबुकवर महिलांशी मैत्री करून, तसेच त्यांची अश्लील छायाचित्रे तयार करून तो महिलांना ब्लॅकमेल करीत असे. प्रदीश कुमार असे आरोपीने नाव असून, त्याला एट्टुमनूरजवळील अलीपरांबू येथून शुक्रवारी अटक करण्यात आली. एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. प्राथमिक चौकशीतून त्याचे कारनामे समोर आले.
पोलिसांनी सांगितले की, प्रदीश कुमार प्रामुख्याने विवाहित महिलांना आपली शिकार बनवीत असे. तो फेसबुकवर महिलांशी मैत्री करीत असे. गोडीगुलाबीने महिलांचा फोन नंबर मिळवीत असे. सहानुभूती दाखवून महिलांच्या कौटुंबिक समस्या माहिती करून घेत असे. नंतर तो स्वत: महिला असल्याचे भासवून फेसबुकवर खोटे खाते उघडीत असे.
फेसबुकप्रमाणेच इतर समाजमाध्यमांचा वापरही तो करीत असे. एखाद्या महिलेने त्याच्या सूचनेनुसार वागायचे नाकारल्यास तो तिची अश्लील छायाचित्रे तिच्या पतीला पाठविण्याची धमकी देत असे. त्याच्या लॅपटॉपमध्ये असंख्य महिलांची अश्लील छायाचित्रे सापडली आहेत.
दुबळ्या महिला चटकन बळी पडतज्या महिलांना टार्गेट करायचे त्या महिलांच्या नवऱ्यांशी तो खोट्या महिला खात्यावरून अश्लील चॅटिंग करीत असे. नंतर या चॅटिंगचे स्क्रिनशॉटस् त्या पुरुषांच्या बायकांना पाठवीत असे. महिलांच्या मनात आपल्या नवºयाबद्दल द्वेष निर्माण करण्यात यश मिळाल्यानंतर तो या महिलांशी आपल्या खºया फेसबुक खात्यावरून चॅटिंग करून सहानुभूती आणि काळजी दाखवीत असे.
विश्वास संपादन केल्यानंतर त्यांच्याशी व्हिडिओ चॅटिंग करीत असे. या टप्प्यावर तो महिलांना त्यांचे फोटोशॉप केलेले अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल करीत असे. कमजोर महिला त्याच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडत. मग त्यांचे लैंगिक शोषण करीत असे. ही मोडस आॅपरेंडी वापरून त्याने ५0 पेक्षा जास्त महिलांचे लैंगिक शोषण केले.