वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका यांच्यात 5क्क् अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष्य ठरविण्यात आले असून त्यासाठी दोन्ही देशांनी आणखी व्यापक आर्थिक सहकार्य करण्याचे निश्चित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. व्यावसायिक गुंतवणूक वाढविण्यासाठी हे दोन देश संयुक्तपणो कार्यक्रम राबविणार आहेत, अशी माहिती या बैठकीनंतर देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आर्थिक, ऊर्जा आणि सुरक्षा या क्षेत्रतील सहकार्यातून वृद्धिंगत करण्यासाठी दोन दिवसांच्या चर्चेत भर होता.
भारतात फेर वापराच्या ऊर्जा विकासासाठी यूएस एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक भारताला 1 अब्ज डॉलर्सची सवलत देणार आहे. भारत व अमेरिका यांच्यात सध्या 1क्क् अब्ज डॉलर्सचा व्यापार असून तो तब्बल 5क्क् अब्ज डॉलर्स करण्यास मोदी व ओबामा यांनी मान्यता दिली. मात्र, हे लक्ष्य गाठण्यासाठी निश्चित मुदत ठरवून देण्यात आलेली नाही.
त्याआधी यूएस- इंडिया बिझनेस कॉन्सिलने (यूएसआयबीसी) आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोदींनी अमेरिकी उद्योगपतींना भारतात येण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला यूएसआयबीसीचे अध्यक्ष व मास्टर कार्डचे सीईओ अजय बंगा, जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, मुकेश अंबानी आणि भारत व अमेरिकेतील मोठे उद्योगपती उपस्थित होते. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात नवा अध्याय घडत असल्याचे बंगा यांनी सांगितले.
मोदी सरकारने त्याच्या पहिल्या 3 महिन्यांत घेतलेल्या निर्णयांमुळे यूएसआयबीसीचे सदस्य येत्या दोन ते तीन वर्षात 41 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारतात करणार आहेत, असे बंगा म्हणाले. भारत अमेरिका यांच्यातील संबंधांचे चांगले दिवस येत असून एक निवडणूक कसा आमूलाग्र बदल घडविते, असेही त्यांनी
सांगितले. (वृत्तसंस्था)
4व्यवसायाला अनुकूल असे वातावरण असलेला देश म्हणून भारत वाटचाल करीत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगून अमेरिकेतील मोठय़ा कंपन्यांनी फार उशीर व्हायच्या आधी भारतात आपला व्यवसाय सुरू करावा व त्याचा विस्तार करावा, असे आवाहन केले.
4यूएस- इंडिया बिझनेस कॉन्सिलने (यूएसआयबीसी) मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी अमेरिकन व्यावसायिकांना वरील आवाहन केले. भारतीय अर्थव्यवस्थेत झपाटय़ाने होत असलेले बदल व विकासाचा लाभ अमेरिकन उद्योजकांनी घ्यावा, असे मोदी म्हणाले. एकत्रितपणो आपण विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचू. मी तुम्हाला निमंत्रित करतो. तुम्ही सगळे ‘मेक इन इंडिया’साठी यावे, असे माङो आवाहन आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
4अजमेर, विशाखापट्टणम आणि अलाहाबाद शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी या शहरांत अमेरिकेचे उद्योग यावेत या भारताच्या देकाराचे अमेरिकन सरकारने स्वागत केले आहे.