शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
7
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
8
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
9
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
10
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
11
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
12
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
13
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
14
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
15
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
16
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
17
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
18
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
19
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
20
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

५०० कोटींचा भ्रष्टाचार इम्रान खानवर प्रश्नांची सरबत्ती, अधिकारी गेले रावळपिंडी तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 5:52 AM

Imran Khan: पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी तपास संस्थेने ५० अब्ज रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांची कारागृहात चौकशी केली.

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी तपास संस्थेने ५० अब्ज रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांची कारागृहात चौकशी केली.

नॅशनल अकाउंटॅबिलिटी ब्युरोचे (एनएबी) पथक रविवारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या प्रमुखांची चौकशी करण्यासाठी अदियाला तुरुंगात आले होते. इम्रान खान (७१) विविध प्रकरणांत दि. २६ सप्टेंबरपासून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतील रावळपिंडीतील  तुरुंगात आहेत. एनएबीच्या पथकाने त्यांची ५० अब्ज रुपयांच्या अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात  चौकशी केली. दोन तासांहून अधिक काळ ही चौकशी चालली. 

न्यायालयीन कोठडीपाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने सोमवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. खान यांची पोलिस कोठडी वाढविण्याची एनएबीचीची विनंती न्यायालयाने फेटाळली. न्यायाधीश मोहंमद बशीर यांनी रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणाची सुनावणी केली. 

काय आहे प्रकरण?-अल-कादिर ट्रस्ट प्रकरण १९० दशलक्ष पौंडाच्या (सुमारे ५० अब्ज रुपये) रकमेशी संबंधित आहे.- ही रक्कम ब्रिटनच्या राष्ट्रीय गुन्हे संस्थेने पाकिस्तानी बांधकाम व्यावसायिकाकडून वसूल करून पाकिस्तानला पाठवली होती.- इम्रान खान यांनी ही रक्कम राष्ट्रीय तिजोरीत जमा करण्याऐवजी ४५० अब्ज रुपयांच्या दंडाची अंशत: पूर्तता करण्यासाठी संबंधित व्यावसायिकाला वापरण्याची परवानगी दिली.-त्या बदल्यात या बांधकाम व्यावसायिकाने खान व त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या ट्रस्टला सुमारे ५७ एकर जमीन भेट दिली होती. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान