मुंबई : मागील वर्षी ५०,८०२ भारतीयांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे. मेक्सिकन लोकांनंतर भारतीय दुसऱ्या स्थानी होते. अमेरिकन गृह संरक्षण विभागाने ही माहिती जाहीर केली आहे.अमेरिकेन नागरिकत्व मिळविण्यासाठी अनेकजण धडपड करतात. २०१६ मध्ये ४६,१८८ भारतीयांना हे नागरिकत्व मिळाले, तर २०१७ मध्ये त्यात १० टक्के वाढ झाली.जगभरातील ७.०७ लाख नागरिकांनी २०१७ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळवले. त्यात ७.१० टक्के भारतीय होते. हेच प्रमाण २०१६ मध्ये ६.१० टक्के होते. नागरिकत्व मिळविण्यात मेक्सिकन नागरिकांची संख्या २०१७ मध्ये सर्वाधिक १.१८ लाख होती. त्यात २०१६ च्या तुलनेत १४.५ टक्के वाढ झाली. चीनी नागरिक तिसºया स्थानी होते. २०१७ मध्ये ३७,६७४ चीनी नागरिकांनी अमेरिकेचे नागरिकत्व मिळवले. त्यात २०१६ च्या तुलनेत ५.२ टक्के वाढ झाली. नागरिकत्व घेण्याच्या एकूण संख्येत मात्र घट झाली. सन २०१६ मध्ये ७.५३ लाख लोकांनी अमेरिकन नागरिकत्व घेतले होते.अर्जांमध्ये झपाट्याने वाढमागील दोन वर्षात कंपन्यांनी मूळ अमेरिकन नागरिकांनाच अधिकाधिक नोकºया देण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे ‘ग्रीन कार्ड’धारकांकडून नोकरी जाण्याच्या भीतीने नागरिकत्वासाठीच्या अर्जात वाढ झाली आहे. परिणामी नागरिकत्व मिळविण्याच्या भारतीयांच्या संख्येत वाढ झाली.
५०,८०२ भारतीयांना मिळाले अमेरिकेचे नागरिकत्व; वर्षभरात १० टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:05 AM