चंद्रावर पाऊल ठेवून मानवी संस्कृतीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरणाऱ्या अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर मात्र अनेक शारीरिक आणि मानसिक संकटांचा सामना करावा लागला. यापैकी काहींचे कुटुंब उद्ध्वस्त झाले तर कुणी मनोरुग्ण झाले.
चंद्रावर पाऊल ठेवणारे सर्वांत तरुण अंतराळवीर चार्ली ड्यूक यांच्या कुटुंबाला त्यांच्याशी जमवून घेणे कठीण झाले होते. ते अंतराळ आणि पृथ्वीतील वातावरणात ताळमेळ घालू शकले नाहीत. त्यांचे वैवाहिक जीवनही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. जिनी सर्नन यांचे लग्न मोडलेच; तर बज एल्ड्रिन दारूच्या आहारी जाऊन नैराश्यग्रस्त झाले. एलन बीन कलाकार झाले आणि एड मिशेल यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. दर्शनशास्त्रात त्यांची रुची वाढली. सांगण्याचे तात्पर्य हे की, चंद्रावर पाऊल ठेवणाºया या १२ मानवांचे विचार, सवयी आणि आवडीनिवडी चंद्राने नेहमीकरिता बदलविल्या.
चंद्रावर अमेरिकेचे यान कोसळले तेव्हाचंद्रावरील हवामान आणि परिस्थितीची सखोल माहिती घेण्याकरिता नासाने पाठविलेले रोबॉट स्पेसशिप लॅडी (लुनर अॅटमॉस्पिअर अॅण्ड डस्ट एनव्हायर्नमेंट एक्सप्लोरर) चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचताच नष्ट झाले. ही घटना एप्रिल २०१४ ची आहे.
लॅडीचे प्रकल्प वैज्ञानिक रिक एल्फिक यांनी सांगितले की, ज्या वेळी ही स्पेसशिप नष्ट झाली त्या वेळी तिचा वेग ताशी सुमारे ५,८०० किमी एवढा होता. हा वेग रायफल बुलेटच्या वेगाच्या तीनपट अधिक आहे.
इंधन संपल्यामुळे लॅडी चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यास अपयशी ठरले. ही स्पेसशिप नष्ट झाल्याने नासाच्या अंतराळ कार्यक्रमाला फार मोठा धक्का बसला होता. या स्पेसशिपचे सप्टेंबर २०१३ मध्ये व्हर्जिनियातून प्रक्षेपण करण्यात आले होते.
पन्नास वर्षांपूर्वी चंद्राकडे पहिल्यांदा झेपावलेले नासाचे यान; पाहा रोमांचकारी फोटो
पृथ्वीच्या चंद्रावर घेतले होते प्रशिक्षण२० जुलै १९६९ रोजी अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगने अपोलो-११ मधून बाहेर पडत चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते तेव्हा या यशामागे आईसलॅण्डमधील प्रशिक्षणाचीही महत्त्वाची भूमिका होती. अंतराळवीरांना अशा ठिकाणी प्रशिक्षण दिले जावे येथील पृष्ठभूमी चंद्राच्या भूपृष्ठाशी मिळतीजुळती आहे, असे नासाला वाटले होते. भरपूर शोध घेतल्यावर आईसलँडमधील मासेमारांचे एक लहानसे गाव हुसाविकची निवड करण्यात आली.
लोकवसाहती निर्माण करण्याची योजनाअमेरिका इ.स. २०२८ पर्यंत चंद्र्रावर आपले एक स्थायी केंद्र स्थापन करण्यास इच्छुक आहे. चंद्रावर मोठे उद्योग उभारण्याची क्षमता निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे. चीन आणि अमेरिका हे दोन्ही देश चंद्रावर लोकवस्ती आणि उद्योग सुरू करण्यास उतावीळ आहेत. पृथ्वीवर अस्तित्वात असलेले पारंपरिक ऊर्जा स्रोत भविष्यात संपुष्टात येतील, असे चीनला वाटत आहे.