शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

56 कोटी युझर्सना तात्काळ पासवर्ड बदलण्याची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2017 2:01 PM

वन्नाक्राय’ या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला असतानाच आता जगभरात 56 कोटी लोकांचे वैयक्तिक इमेल आणि पासवर्ड लीक झाल्याची धक्कादायक माहिती झाली आहे

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 17 - ‘वन्नाक्राय’ या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला असतानाच आता जगभरात 56 कोटी युझर्स वैयक्तिक इमेल आणि पासवर्ड लीक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 10 प्रसिद्ध वेबसाइटवरून युझर्सची माहिती हॅकर्सनं चोरली असल्याचा शोध क्रॉमटेक सिक्युरिटी रिसर्चर सेंटरनं लावला आहे. त्यामुळे जीमेल आणि याहूसारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाइट हाताळणा-या युझर्सना तात्काळ पासवर्ड बदलण्याची सूचना करण्यात आली आहे. क्रॉमटेक सिक्युरिटी रिसर्चर सेंटरनं एक वेबसाइटही डेव्हलप केली आहे.
Have I Been Pwned या वेबसाइटवर तुम्ही तुमचा यूझर्स नेम किंवा इमेल आयडी टाकल्यास तुम्हाला तुमचा पासवर्ड हॅक झाल्याची माहिती मिळणार आहे. तसेच कोणत्या वेबसाइटद्वारे तुमचे पासवर्ड हॅक करण्यात आले आहेत, त्या वेबसाइटचीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. क्रॉमटेकचे संशोधक बॉब डाइकेंको यांच्यामते, 243.6 दशलक्ष युझर्सचे इमेल अॅड्रेस आणि पासवर्ड लिंक्डइन, ड्रापबॉक्स, लास्ट एफएम, मायस्पेस, अडोब, नेओपेट्स, टुम्ब्लर आणि इतर वेबसाइटच्या माध्यमातून हॅक करण्यात आले आहेत. या वेबसाइटवरून डेटाबेस चोरलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही, मात्र संशोधकांनी त्या हॅकर्सला "एडी" असे नाव दिले आहे. मोंगो डीबीसारखे डेटा बेस प्रोग्रॅम असुरक्षित असल्याचंही बॉब डाइकेंको म्हणाले आहेत. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात होस्ट केलेला अनेक टेराबाइट डेटा मोंगो डीबीच्या माध्यमातून चोरण्यात आल्याची शक्यताही बॉब डाइकेंको यांनी व्यक्त केली आहे. 
(पासवर्ड सुरक्षित ठेवण्याच्या 8 सोप्या टिप्स)
पासवर्ड बनविण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी मात्र अवश्य घेतली पाहिजे. आठवण्यास सोपा असलेला पासवर्ड वापरण्यास सोपा असतो, पण आर्थिक देवाणघेवाण जेथे होते त्या वेबसाईटवर असे सोपे पासवर्ड वापरणे सुरक्षित नसते. पासवर्ड चोरीला जाण्याचा जागा वेगवेगळ्या असू शकतात. काही व्हायरस मध्ये कीलॉगर हा सोफ्टवेअर वापरलेला असतो. 
 
 
तसेच जर कोणाला तुमचे पासवर्ड चोरायचे असेल तर अशा व्यक्ती, तुम्ही वापरीत असलेल्या सार्वजनिक संगणकावर हा सोफ्टवेअर वापरून तुमचा पासवर्ड चोरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक संगणकावर इंटरनेट वापरताना अधिक काळजी घ्यावी. आपण यासाठी अनेक प्रकारचे उपाय योजू शकतो. व प्रत्येक उपायाचा परिणाम हा भिन्न भिन्न असतो. सुरक्षित पासवर्ड बनवणे हा उपाय तुम्हाला इंटरनेट वर ह्याक होणाऱ्या पासवर्ड चोरीपासून वाचवू शकतो. जाणून घ्या पासवर्ड सुरक्षित ठेवण्याच्या 8 सोप्या टिप्स 
 
तुमचा पासवर्ड मोठा असू द्या. पासवर्डमध्ये किमान आठ कॅरेक्टर अवश्य द्या. पण त्यापेक्षा जास्त कॅरेक्टर असणारा पासवर्ड कधीही चांगला ठरेल.
 
पासवर्डमध्ये अल्फा न्यूमरीक असावा. यामध्ये एक कॅपिटल अक्षर, एक अंक आणि एखादं स्पेशल कॅरॅक्टर असावं. जसे की - Abcd@789
 
कधीही आपल्या स्वत:चं किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर आधारित पासवर्ड बनवू नका
 
पासवर्ड सेट करताना अशा अंकांचा वापर करु नका जे तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे, उदाहरणार्थ वाढदिवस, जन्मसाल, मोबाईल नंबर इत्यादी.
 
कधीही एकच पासवर्ड सर्व अकाऊंटसाठी वापरु नका, बँकिंग पासवर्ड किंवा ट्रेडिंग अकाऊंचा पासवर्ड बनवण्यासाठी विविध नंबरचा उपयोग करा
 
आपला पासवर्ड ठराविक काळाने बदलत राहा
 
डिक्शनरीतले शब्द शक्यतो टाळा, असे शब्द हॅक होण्याची शक्यता जास्त असते. जसे की - Ne@r (Near) वगैरे.
 
तुमच्या आवडत्या वाक्याच्या पहिल्या अक्षराचा मिळून पासवर्ड तयार करा. उदाहरणार्थ the quick brown fox jumps over the lazy dog या वाक्याचं पहिलं अक्षर मिळवून tqbfjotld असा पासवर्ड तयार होईल.