आयसिसच्या दहशतवाद्यांना (ISIS terrorist) संपविण्याच्या तसेच संभाव्य हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेने काबूलमध्ये (Kabul) ड्रोन हल्ले केले. यामध्ये सहा मुलांसह 9 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे बायडेन सरकारवर टीका होऊ लागली आहे. हे सर्व मृत हे एकाच कुटुंबातील होते. (Blast outside Kabul airport again amid security alert; rocket targeted residential building.)
इस्लामिक स्टेट खुरासान गटाचे दहशतवादी काबूल विमानतळावर आणखी हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. हे दहशतवादी बसलेल्या एका वाहनाला ड्रोनने उडविण्यात आले. हे वाहन रहिवासी भागातून जात होते. यामुळे त्या परिसरात असलेल्या 9 लोकांचाही मृत्यू झाला आहे.
यानंतर आज सकाळी काबूलच्या विमानतळावर सोमवारी सकाळी रॉकेट डागण्यात आले. सकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास काबूल विमानतळाच्या परिसरात हल्ला केला. एका वाहनातून रॉकेट डागण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रॉकेट हल्ल्यांमुळे वेगवेगळ्या जागांवर धुराचे लोट उठले होते. काही ठिकाणी आगीच्या घटना घडल्या, वाहनांचे नुकसान झाले आहे. विमानतळावर येणारे रॉकेट विमानतळावरील एअर फिल्ड डिफेन्सने पाडले.
नंतर अमेरिकेला अधिकार नाहीत : तालिबानअमेरिकेला ३१ ऑगस्टनंतर अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक करण्याचा अधिकार राहणार नाही. यापुढे असा प्रयत्न रोखण्यात येईल, असे तालिबानने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने दोन दिवसांमध्ये दोन एअर स्ट्राईक केले आहेत.
...तर आणखी एअर स्ट्राइक करू : बायडेनबायडेन यांनी आणखी एअर स्ट्राईक करण्याचे स्पष्ट केले आहे. काबूल विमानतळावरील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १३ अमेरिकन सैनिकांचे पार्थिव अमेरिकेतील डेलवेअर येथे दाखल झाले. बायडेन यावेळी स्वत: उपस्थित होते.
आयसिसच्या खोरासान गटात अनेक भारतीयआयसिसच्या खोरासान गटात अनेक भारतीय सामील असल्याचा दावा संघटनेच्या कमांडरने केला आहे. याच्या हाताखाली ६०० जण असून, त्यात माेठ्या संख्येने पाकिस्तानी व भारतीय आहेत. आम्हाला इस्लामी शरिया कायदा लागू करायचा आहे. अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानमध्ये आयसिसला पाय पसरणे साेपे होईल, असे तो म्हणाला.