सिडनी - ऑस्ट्रेलियात जंगलाला लागलेल्या आगीत २९ लोकांनी आपला जीव गमावला त्याचसोबत हजारो घरे उद्धवस्त झाली. १ कोटीपेक्षा अधिक मुक्या प्राण्यांची आगीत होरपळून जीव गेला. संपूर्ण जगात या आगीमुळे हळहळ व्यक्त करण्यात आली होती आगीतून मुक्या प्राण्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न वन्यजीव प्रेमी तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी करत होते. तसेच्या या दुर्घटनेतील पीडितांना मदत करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात मदत केल्याचं दिसून आलं.
पैसे, कपडे आणि अन्य जीवनावश्यक गोष्टी मदतीच्या स्वरुपात येथील पीडितांना मिळाल्या. अशातच एका लहान मुलाचं सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. आगीत झालेल्या मुक्या प्राण्यांच्या मृत्यूने हिंगहॅम, मॅसेच्युसेट्समधील ६ वर्षीय ओवेन कॉलीला खरोखर अस्वस्थ केले. आगीत काही जखमी झालेले प्राणी आहेत की नाही अशी विचारणा त्याने आपल्या आई कॅटलिन कोलीला केली होती. या दुर्घटनेबद्दल माहिती मिळाल्याने पीडितांना आपल्यापरीने मदत करण्याचा ओवेनने इरादा केला.
त्यानंतर, ओवेनने चिकणमातीपासून लहान कोआल्स बनवण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांच्या पालकांनी मिळणारी देणगी न्यू साऊथ वेल्समधील वन्यजीव बचाव संस्थेला देण्याबाबत योजना आखली. यासाठी ५० डॉलर आणि त्याहून अधिक देणगी देणाऱ्या व्यक्तीसाठी कॉली कुटुंब त्यांना एक कोला भेट म्हणून देत असे. ऑस्ट्रेलियन वन्यजीव रक्षणासाठी ओवेन चिकणमातीपासून लहान कोआला बनवत लोकांकडून पैसे मागण्याचं आवाहन केलं.
कॅटनलिन कॉले यांनी मंगळवारी सीएनएनला सांगितले की, “ओवेनने स्वतःहून दुसर्या कशासाठी काहीतरी बनवण्याची खरोखरच पहिली वेळ होती. “आम्ही त्याला विचारले की त्याला मदत करायची आहे का? त्यावर त्याने हो सांगितले. तेव्हा आम्ही चिकणमाती कोआल्स बनविण्यास सुरुवात केली. जी व्यक्ती यासाठी मदत करेल त्यांना आम्ही एक कोआला भेट म्हणून देतो.
याबाबत बोलताना ओवेनने सांगितले की, ऑस्ट्रेलियाविषयी त्यांनी अधिक जाणून घ्यावे अशी मला इच्छा आहे आणि ऑस्ट्रेलियात कोणते प्राणी आहेत याविषयी त्यांनी अधिक जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे, आतापर्यंत ओवेनने सुमारे 55 कोलाआ बनवून लोकांना भेट म्हणून दिले तर यातून तब्बल २ लाख डॉलर(दीड कोटी रुपये) रक्कम जमा केली आहे.