शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

वन्यजीवांच्या संख्येत ६० टक्के घट; सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 4:46 AM

मानवाकडून होणाऱ्या नैसर्गिक साधनांच्या अनिर्बंध लुटीमुळे वन्य सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात

पॅरिस : मानवाकडून होणाऱ्या नैसर्गिक साधनांच्या अनिर्बंध लुटीमुळे वन्य सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे, सजीवांच्या असंख्य प्रजाती अल्पावधीत विनष्ट होण्याचा नवा विनाशकारी कालखंड सुरूझाला आहे आणि मानवाचा वाढता हव्यास पूर्ण करण्याची पृथ्वीची क्षमता संपत आली आहे, असा भयसूचक इशारा निसर्गरक्षणासाठी झटणाऱ्या ‘वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड’ (डब्ल्यूडब्ल्यू एफ) या जागतिक स्वयंसेवी संस्थेने दिला आहे.जगभरात १६,७०० हून अधिक ठिकाणी आढळणाºया सजीवांच्या चार हजारांहून अधिक प्रजातींचे निरंतर सर्वेक्षण ही संस्था करीत असते. त्याच्या आधारे सजीवसृष्टीच्या स्थितीचा आढावा घेणारा ‘लिव्हिंग प्लॅनेट’ हा अहवाल संस्थेने प्रसिद्ध केला. त्यानुसार १९७० ते २०१४ या ४४ वर्षांच्या काळात मानवाकडून निसर्गावर केल्या जात असलेल्या अत्याचारांमुळे मासे, पक्षी, जलचर, सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी यासारख्या पाठीचे हाड असलेल्या सजीवांच्या ६० टक्के प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत.अहवालानुसार याच काळात गोड्या पाण्यातील जलचरांची संख्या याहूनही जास्त म्हणजे ८० टक्क्यांनी घटली. प्रादेशिक तुलना केली तर याचा सर्वाधिक फटका लॅटिन अमेरिका क्षेत्रास बसला. तेथील वन्यजीवांची संख्या ९० टक्क्यांनी रोडावली. गेल्या ५० लाख वर्षांत पृथ्वीवरील सजीवसृष्टी अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर विनष्ट होण्याचे (मास एक्स्टिंग्शन) पाच कालखंड होऊन गेले. आता सहाव्या कालखंडाकडे वाटचाल सुरू असल्याचे संकेत या सर्वेक्षणातून मिळवलेल्या माहितीच्या विश्लेषणातून मिळतात, असेही  ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ने म्हटले आहे.अहवाल म्हणतो की, विविध प्रजातींच्या विनष्टतेची स्थिती निरनिराळी असली तरी प्रजाती नष्ट होण्याचे सध्याचे प्रमाण काहीशे वर्षांपूर्वी होते त्याहून ते १०० ते एक हजार पटीने वाढले आहे. या काळात माणसाने आपल्या गरजा भागविण्यासाठी पृथ्वीची बेसुमार ओरबाडणूक सुरू केली व त्यामुळे अन्य सजीवांचे जगणे मुश्किल झाले.हा अहवाल तयार करणाºया ५९ वैज्ञानिकांपैकी पियरे व्हिस्कोंती म्हणाले की, ही आकडेवारी भयावह आहे. संख्या कमी होत असेल तर ती घसरण रोखता येऊ शकते; पण एकदा विनष्ट झालेली प्रजाती पुनरुज्जीवित करता येत नाही. प्रवाळद्वीपांच्या बाबतीत परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. २५ टक्के समुद्रीजीवांचे जीवन प्रवाळद्वीपांवर अवलंबून असते; परंतु सागरांमध्ये पाठोपाठ आलेल्या उष्णतेच्या लाटांनी निम्मीअधिक प्रवाळद्वीपे याआधीच नष्ट झाली आहेत. वन्य जीवांचा वाटा फक्त ४ टक्के८० पानांच्या अहवालात असेही नमूद केले आहे की, सर्व सजीवसृष्टीचा वजनाच्या वा ‘बायोमास’च्या दृष्टीने विचार केला तर आज यात वन्यजीवांचा वाटा फक्त चार टक्के राहिला आहे. बाकीचा हिस्सा मानवाचा (३६ टक्के) आणि पाळीव पशुधनाचा (६० टक्के) आहे. या प्रमाणाच्या उतरंडीला बहुधा १० हजार वर्षांपूर्वी सुरुवात झाली असावी....तर स्थिती आणखी बिघडेलपरिस्थिती खरेच खूप वाईट आहे आणि ती आणखी वाईट होत चालली आहे, तरीही नेमके काय आणि कशामुळे होत आहे, याची आपल्याला माहिती आहे, हे त्यातल्या त्यात चांगले आहे. हे थांबविण्यासाठी आपण काहीच प्रयत्न केले नसते तर परिस्थिती याहूनही खराब असती.-मार्को लॅम्बेर्तिनी, महासंचालक, डब्ल्यूडब्ल्यूएफ

टॅग्स :wildlifeवन्यजीवenvironmentवातावरण