शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Sunita Williams: 62 तास 9 मिनिटे स्पेसवॉक, 150 हून अधिक प्रयोग अन्...; सुनीता विल्यम्स यांनी 9 महिने अंतराळात काय-काय केलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 05:53 IST

Sunita Williams Return : सुनीता विल्यम्स या गेल्या 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्या होत्या. त्यांचा हा प्रवास केवळ 8 दिवसांचाच होता. मात्र, काही तांत्रिक समस्यांमुळे तो लांबला आणि त्यांना तब्बल 9 महिने तेथेच थांबावे लागले. यानंतर आता त्या पुन्हा पृथ्वीवर परतल्या आहेत. आपल्या या मोहिमेत त्यांनी अंतराळात बरीच महत्वाची कामे केली...

अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आपल्या सहकाऱ्यांसोबत तब्बल 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या आहेत. स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने त्यांचे फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग झाले. त्या गेल्या 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्या होत्या. त्यांचा हा प्रवास केवळ 8 दिवसांचाच होता. मात्र, काही तांत्रिक समस्यांमुळे तो लांबला आणि त्यांना तब्बल 9 महिने तेथेच थांबावे लागले. यानंतर आता त्या पुन्हा पृथ्वीवर परतल्या आहेत. आपल्या या मोहिमेत त्यांनी अंतराळात बरीच महत्वाची कामे केली आहेत.

सुनिता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकावरील आपल्या 9 महिन्यांच्या काळात, साधारणपणे फुटबॉल मैदानाच्या आकाराच्या या अंतराळ स्थानकाची देखभाल आणि स्वच्छता केली. याशिवाय, त्यांनी येथील जुनी उपकरणेही बदलली आणि काही वैज्ञानिक प्रयोगही केली. 

हेही वाचा - Sunita Williams VIDEO: अखेर तब्बल 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या, फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर 'ड्रॅगन'चं यशस्वी लँडिंग

62 तासा 9 मिनिटे स्पेसवॉक अर्थात 9 वेळा स्पेसवॉक -नासाच्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने 900 तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी 150 हून अधिक प्रयोगही केले. याच बरोबर, सुनीता विल्यम्स यांनी, 'अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला' म्हणूनही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल 62 तास 9 मिनिटे घालवली अर्थात 9 वेळा स्पेसवॉक केले.

नवे रिअ‍ॅक्टर्स विकसित केले -सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले. या अभ्यासात गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालींवर काय परिणाम होतो हे दिसून येते. त्यांनी पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिअ‍ॅक्टर्स विकसित करण्यासंदर्भात संशोधन केले.

हेही वाचा - पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? पाहा VIDEO

येथे सुनीता विल्यम्स यांनी बायोन्यूट्रिएंट्स प्रोजेक्टमध्येही भाग घेतला होता. यात शास्त्रज्ञ मंडळी बॅक्टेरिया वापरून पोषक तत्वे तयार करण्याच्या पद्धतीचे अध्ययन करतात. या प्रोजेक्टमुळे अंतराळवीरांना ताजी पोषक तत्वे मिळण्यास मदत होऊ शकते.

टॅग्स :Sunita Williamsसुनीता विल्यम्सNASAनासाAmericaअमेरिका