मॉस्को : पूर्व रशियाच्या सायबेरियातील केमेरोव्हो शहरात विंटर चेरी मॉलला रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीत ६४ जण ठार झाले. शाळांना लागलेल्या सुट्यांचा हा पहिलाच आठवडा असल्यामुळे मॉलमध्ये मुले आणि त्यांच्या पालकांची मोठी गर्दी होती. हा मॉल मॉस्कोच्या पूर्वेकडे सुमारे तीन हजार किलोमीटरवर आहे.हा मॉल संपूर्ण रात्रभर मॉल जळत होता. ती आग सोमवारी सकाळनंतर विझवण्यात आलीआणि काही मृतदेह चित्रपटगृहात आढळले. अग्निशमन दलाने मॉलच्या चार मजल्यांवरील शोध मोहीम पूर्ण केल्यानंतर ६४ जणांचा मृत्यूझाल्याचे स्पष्ट झाले. आणखी सहा मृतदेह आतमध्ये असल्याचे सांगण्यात आले. याखेरीज अनेक जण बेपत्ता आहेत.इमर्जन्सी सिच्युएशन विभागाचे मंत्री व्लादिमिर पुचकोव्ह म्हणाले की, दहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग नेमकी कोणत्या कारणांमुळे लागली याबाबत स्थानिक प्रशासन अधिक तपास करीत आहे .कित्येक जखमी व बेपत्ता; अग्निशमन यंत्रणाच होती निकामी, रात्रभर आगीचे तांडवमॉलच्या चौथ्या मजल्यावरून ११ वर्षांच्या मुलाने खिडकीतून उडी मारल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याचे पालक आणि धाकटा भाऊ आगीत दगावले आहेत. चौकशी समितीने मॉलच्या भाडेकरूंसह चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगीचे नेमके कारण मात्र समजलेले नाही. सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन आणि दुर्लक्ष झाल्याची शक्यता तपासली जात आहे. आग लागल्याचा इशारा देणारा भोंगा वाजला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मॉलमधून लोकांना बाहेर काढता आलेले नाही. मात्र आग लागताच मॉलमधील सर्व कर्मचारी तेथून पळून गेले, असे साक्षीदारांचे म्हणणे आहे.आरडाओरडा केल्यामुळे समजलेया मॉलच्या जागीपूर्वी मिठाईचा कारखाना होता. त्याचे २०१३ मध्ये मॉलमध्ये रूपांतर झाले. विंटर चेरी मॉल मुलांमध्ये करमणुकीसाठी खूप लोकप्रिय होता. इथे प्राणी संग्रहालय व चित्रपटगृहही होते. अॅना झॅरेचनेव्हा सगळ््यात वरच्या मजल्यावर पती व मुलासह चित्रपट बघत होत्या. याच मजल्यावर आधी आग लागली. त्या म्हणाल्या, चित्रपटगृहात एक जण आग लागल्याचे ओरडत आल्यावरच आम्हाला कळाले. चित्रपट सुरू असल्याने दिवेही बंद होते. हा चित्रपट आमच्यासाठी शेवटचा ठरणार, असे वाटले होते. मॉलचे सुरक्षा कर्मचारी कुठेही दिसत नव्हते. माझे पती वरच्या पायºयांवर उभे राहून लोकांना बाहेर पडण्यास मदत करीत होते.जाता-जाता चिमुकली म्हणाली...‘‘माझा श्वास गुदमरतोय... घरच्यांना सांगा... आय लव्ह देम! इथे सर्वकाही जळतेय. सर्व दरवाजेही बंद करण्यात आले आहेत. बाहेर पडण्यासाठी एकही जागा नाही..’’ हे अखेरचे शब्द होते १२ वर्षांच्या एका चिमुकलीचे. आगीत मृत्यू झालेल्या व्हिक्टोरिया पोचांकिना हिने जाता-जाता घरच्यांना असा संदेश दिला.
रशियातील मॉलला लागलेल्या भयावह आगीत ६४ जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 3:43 AM